ETV Bharat / sitara

इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२१मध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओने मारली बाजी

author img

By

Published : Aug 25, 2021, 5:30 PM IST

अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रसारित केलेल्या अनेक शोज आणि वेब-फिल्म्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तुती मिळत असून बऱ्याच फिल्म फेस्टिवल्स मध्ये अवॉर्ड्स सुद्धा मिळताना दिसतेय. नुकताच इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२१ संपन्न झाला आणि त्यात अमेझॉन प्राईम व्हिडिओने सात पुरस्कारांची कमाई केली आहे.

इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२१
इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२१

गेल्या काही वर्षांत अमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतला असून तो आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये गणला जातोय. बहुभाषीय निर्मिती करणाऱ्या या प्लॅटफॉर्मने ‘द फैमिली मैन’, ‘मिर्जापुर सीज़न २’, ‘शेरनी’ आणि ‘सोरारई पोटरू’ सारख्या ओरिजिनल शोजचा समावेश आहे. यातील अनेक शोज आणि वेब-फिल्म्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तुती मिळत असून बऱ्याच फिल्म फेस्टिवल्स मध्ये अवॉर्ड्स सुद्धा मिळताना दिसतेय. नुकताच इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२१ संपन्न झाला आणि त्यात अमेझॉन प्राईम व्हिडिओने सात पुरस्कारांची कमाई केली आहे.

भारतीय कंटेंटच्या एका विस्तृत मनोरंजन श्रेणीला प्रदर्शित करणारा मेलबर्न येथील हा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑस्ट्रेलियातील एक मोठा उत्सव असून तो भारतातील सर्वोत्तम मनोरंजनाला एका छताखाली आणतो. अमेझॉन प्राईम व्हिडिओजने इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (आईएफएफएम) २०२१ मध्ये मोठे यश मिळवले असून यामध्ये अमेझॉन ओरिजिनल ‘द फैमिली मैन’ पासून ‘मिर्जापुर सीज़न २’, ‘शेरनी’ आणि ‘सोरारई पोटरू’ आदी दर्जेदार सीरीज आणि चित्रपटांचा समावेश आहे.

इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२१मध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओने मारली बाजी
इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न २०२१मध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओने मारली बाजी

या वर्षीच्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (आईएफएफएम) २०२१ मध्ये, 'बेस्ट वेब सीरिज' श्रेणीत भारताचा बहुचर्चित क्राइम ड्रामा मिर्झापूर सीझन २ विजयी ठरला असून सूरीया सिवकुमार आणि विद्या बालन यांनी अनुक्रमे ‘सोरारई पोट्रु’ आणि ‘शेरनी’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार पटकावला आहे. दुसऱ्या सीझनच्या यशस्वीतेनंतर, ‘द फॅमिली मॅन’ मधील श्रीकांत तिवारी ची भूमिका साकारणारा मनोज बाजपेयीला वेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) चा पुरस्कार मिळाला. ‘द फॅमिली मॅन २’ या गुप्तहेर थ्रिलरद्वारे यशस्वी डिजिटल पदार्पण करणाऱ्या, समंथा अक्किनेनी ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, मल्याळम कौटुंबिक ड्रामा, द ग्रेट किचनने 'इक्वालीटी ऑफ सिनेमा’ (फीचर) श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे.

१)अमेझॉन ओरिजिनल सीरीज, मिर्जापुर सीजन २ ‘सर्वश्रेष्ठ वेब सीरीज’, २) ‘सर्वश्रेष्ठ प्रदर्शन’ (पुरुष) सूरीया सिवकुमार, अमेझॉन ओरिजिनल मूवी ‘सोरारई पोटरू’साठी, ३) 'सर्वश्रेष्ठ फिल्म': अमेझॉन ओरिजिनल मूवी ‘ ‘सोरारई पोटरू’ साठी, ४)‘सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस’ (महिला) विद्या बालन ने अमेझॉन ओरिजिनल मूवी, शेरनी मधील भूमिकेसाठी, ५) ‘वेब सीरीज सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस’ (पुरुष): मनोज बाजपेयीने अमेझॉन ओरिजिनल सीरीज ‘द फैमिली मैन’मध्ये श्रीकांत तिवारीच्या आपल्या शानदार प्रदर्शनासाठी, ६) ‘वेब श्रृंखला सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस’ (महिला) सामंथा अक्किनेनीने अमेझॉन ओरिजिनल सीरीज, द फैमिली मैन’ राजी च्या व्यक्तिरेखेतील आपल्या भूमिकेसाठी आणि ७) 'इक्वालीटी ऑफ सिनेमा’ (फीचर): अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील मल्याळम फॅमिली ड्रामा, ‘द ग्रेट किचन’साठी मिळालेले पुरस्कार अमेझॉन प्राईम व्हिडिओने पटकावलेल्या पुरस्कारांच्या यादीत येतात.
हेही वाचा - ‘पोन्नीयन सेल्वान’मध्ये महाराणीच्या अवतारात दिसणार ऐश्वर्या राय, 'शाही लूक' झाला लीक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.