ETV Bharat / sitara

सोनी सबचा ‘फेस्टिवल धमाका’, सर्व शोज दिसणार आठवड्यातून ६ दिवस! - Rakhi Sawant latest news

सोनी सब टीव्हीच्या ‘फेस्टिवल धमाका’मध्ये या वाहिनीवरील सर्व शोज आता आठवड्यातून ६ दिवस दिसणार आहेत. येत्या ९ ऑक्‍टोबरपासून सोनी सबवरील मालिकांचे नवीन एपिसोड्स आठवड्यातून ६ दिवस सादर केले जाणार असून एक उत्‍साहपूर्ण जोडी राखी सावंत व केतन सिंग महासंगम येत्या शनिवारी याची सुरूवात करणार आहेत.

सोनी सब टीव्हीच्या ‘फेस्टिवल धमाका’
सोनी सब टीव्हीच्या ‘फेस्टिवल धमाका’
author img

By

Published : Oct 7, 2021, 4:50 PM IST

Updated : Oct 7, 2021, 5:21 PM IST

सोनी सब ही वाहिनी हलक्या फुलक्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध आहे. अनेकविध विनोदाचे प्रकार इथे प्रेक्षकांना अनुभवायला मिळतात. आता या मनोरंजनात वाढ होणार आहे कारण येतोय सोनी सबचा ‘फेस्टिवल धमाका’, ज्यात या वाहिनीवरील सर्व शोज आता आठवड्यातून ६ दिवस दिसणार आहेत. येत्या ९ ऑक्‍टोबरपासून सोनी सबवरील मालिकांचे नवीन एपिसोड्स आठवड्यातून ६ दिवस सादर केले जाणार असून एक उत्‍साहपूर्ण जोडी राखी सावंत व केतन सिंग महासंगम येत्या शनिवारी याची सुरूवात करणार आहेत.

सोनी सब आनंद पसरवण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत मोठी झेप घेत आहे. हे चॅनेल आता त्‍यांच्‍या मालिकांचे नवीन एपिसोड्स आठवड्यातून ६ दिवस प्रसारित करणार आहे. सोनी सबचे हलके-फुलके कन्‍टेन्‍ट व अद्वितीय पात्र प्रेक्षकांच्‍या मनाला स्‍पर्श करत राहतील आणि गुदगुल्या सुद्धा करतील आणि आनंदाचा दर्जा अधिक मोठा व सर्वोत्तम होण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.

आठवड्यातून ६ दिवस कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍याकरिता सोनी सबने स्‍पेशल महासंगम शनिवारसाठी उत्‍साही जोडी राखी सावंत व केतन सिंग यांची निवड केली आहे. प्रेक्षकांना रोमांचक अनुभव मिळणार आहे. राखी व केतन दोन सर्वात प्रसिद्ध चोर 'बेगम व बादशाह'ची भूमिका साकारणार आहे, जे २१ राज्‍यांमध्‍ये चोरी करून पळून गेले आहेत. कोणालाही त्‍यांचे खरे नाव व खरा चेहरा माहित नाही, कारण त्‍यांनी वेगवेगळ्या रूपामध्‍ये लोकांना फसवले आहे. पोलिसांकडे एकच पुरावा आहे, तो म्‍हणजे त्‍यांचा वेषांतर केलेला पेहराव आणि त्‍यांचे सिग्‍नेचर बेगम बादशाह कार्ड. ही जोडी ९ ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ११ वाजेपर्यंत या स्‍पेशल महासंगम शनिवारमध्‍ये सोनी सबच्‍या सर्व मालिकांमध्‍ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

मालिका 'शुभ लाभ – आपके घर में' मध्‍ये सविताची भूमिका साकारणारी गीतांजली टिकेकर म्‍हणाली, ''महासंगम शनिवार अनेक संधी व रोमांचक कथांना सादर करेल. राखी व केतन सामील होत असल्‍यामुळे एपिसोड्समधील रोमांच व सस्‍पेन्‍स पाहणे अधिक रोमांचक असणार आहे. हे दोघेही एका उद्देशासह आले आहेत. माझ्या मते, प्रेक्षकांना आता आठवड्यातून सहा दिवस भेटणे खूपच उत्‍साहवर्धक आहे. मी अभिमानाने सांगू शकते की, आम्‍ही प्रेक्षकांमध्‍ये आनंद पसरवण्‍याचे अम्बॅसॅडर्स आहोत त्यामुळे ९ ऑक्‍टोबरपासून धमाकेदार मनोरंजनाचा आनंद घ्‍या.''

मालिका 'वागले की दुनिया'मध्‍ये राजेशची भूमिका साकारणारा सुमीत राघवन म्हणाला, ''माझ्या मते, सोनी सबचा हा उत्तम उपक्रम आहे. चॅनेल मोठी झेप घेत प्रेक्षकांना आणखी एक दिवस मनोरंजन देत आहे. चाहत्‍यांनी आमच्‍यावर प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि त्‍यांच्‍या सातत्‍यपूर्ण कौतुकाने चॅनेलला त्‍यांच्‍या जीवनात आणखी एक दिवस मनोरंजन देण्‍यास प्रेरित केले आहे. प्रेक्षकांनी आरामात बसून आम्‍ही त्‍यांच्‍यासाठी सादर करत असलेले मनोरंजनपूर्ण कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद घ्‍यावा.''

सोनी सब परिवाराचा भाग असण्‍याबाबत सांगताना राखी सावंत म्‍हणाली, ''सोनी सब प्रेक्षकांच्‍या जीवनात आनंद आणण्‍यामध्‍ये लक्षणीय भूमिका बजावते. मला या सहयोगाचा भाग असण्‍याचा खूप आनंद होत आहे. सोनी सबचा त्‍यांच्‍या सर्व मालिका सहा दिवस प्रसारित करण्‍याचा निर्णय उत्‍साहवर्धक आहे. माझ्या मते मनोरंजन कधीच थांबू नये. महासंगम शनिवारसाठी केतन व मी चॅनेलवरील मालिकांच्‍या कथानकांमध्‍ये रोमांचक ट्विस्‍ट्स व वळण घेऊन येणार आहे आणि ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. मी तुम्‍हाला खात्री देऊ शकते की, प्रेक्षकांना या शनिवारी मिळणारे रोमांच, उत्साह व पॉवर-पॅक परफॉर्मन्‍सचे संयोजन निश्चितच आवडेल. कारण जेथे राखी असते तेथे मनोरंजन कधीच थांबत नाही!''

हेही वाचा - बिग बॉस मराठीच्या घरात फर्निचर वारण्यास मनाई, स्पर्धकांची चिंता वाढली

Last Updated : Oct 7, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.