ETV Bharat / sitara

ऑनस्क्रीन सासू-सूना पण खऱ्या आयुष्यात आहेत मैत्रिणी, अक्षया नाईक-अतिशा नाईक यांचे अनोखे बॉण्डिंग - atisha naik

कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये भरली असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेत अभिनय करणाऱ्या अतिशा नाईक आणि अक्षया नाईक यांचे ऑफस्क्रीन नातं आई-मुलीसारख्या मैत्रिणींसारखं आहे.

akshaya naik talk about her bond with atisha naik, sundara manamadhe bharli serial
ऑनस्क्रीन सासू-सूना पण खऱ्या आयुष्यात आहेत मैत्रिणी
author img

By

Published : Jun 27, 2021, 9:12 PM IST

टेलिव्हिजनवरील मालिका बराच काळ सुरु असतात. त्यामुळे त्यातील कलाकारही एकमेकांच्या सानिध्यात बराच काळ असतात. साहजिकच बऱ्याच कलाकारांचे अनोखे बॉण्डिंग जमते. काही वेळा कलाकार प्रेमात पडून लग्न करतात आणि काही वेळा इतर नातीसुद्धा विकसित होतात. कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिका संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये भरली असं म्हणायला हरकत नाही. यामधील काही पात्रांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तसेच एकमेकांचीही. सहवासातून प्रेम फुलते असं म्हणतात त्यामुळेच याही मालिकेतील काही कालाकारांमध्ये खूप चांगले नाते तयार झाले आहे.

अनेक दिवस, महिने खूप वेळ एकत्र काम करत असल्याने सेटवर एकत्र राहून बऱ्याच कलाकारांमध्ये हे बॉंडिंग बघायला मिळतं. मालिकेचे शूट करत असताना सेटवरील काही कलाकारांमध्ये चांगली मैत्री होते, एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागतात. तसंच काहीसं इंदूची भूमिका साकारणार्‍या अतिशा नाईक आणि लतिका म्हणजेच अक्षया नाईक यांच्यामध्ये झालं. ऑनस्क्रीन सासू-सून नातं असलं तरीदेखील ते खूप सुंदर आहे आणि अगदीच तसेच ऑफस्क्रीन देखील त्यांचे नाते खूप छान आहे. इंदूसाररखी सासू, आई मिळावी आणि लतिका सारखी समजूतदार मुलगी, सून मिळावी असं सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जातं. अतिशा नाईक आणि अक्षया नाईक यांचे ऑफस्क्रीन नातं आई-मुलीसारख्या मैत्रिणींसारखं आहे.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिका आणि इंदू यांचे ऑफस्क्रीन नातं यावर अक्षया म्हणाली, “माझ्या कामात देखील मला तिचं मार्गदर्शन मिळत असतं. माझं काम अजून कसं चांगलं होईल यासाठी ती नेहेमी मला मदत करते. तिच्याकडे सगळ्या अडचणींवर उपाय असतात. अतिशा ताई आणि इंदू यामध्ये खूप साम्य आहे. खूप मायाळू आहे, मदतीसाठी नेहेमी तयार असते. कुठल्याही गोष्टीला ती कधीच नाही म्हणत नाही. मी आवर्जून सांगते की अतिशाताई असल्याने मला आईची कमतरता भासत नाही.’

“दिवाळीला तिने आमच्यासाठी फराळासोबत एक पत्र दिलं होतं तेव्हा खूप आनंद झाला होता. आम्ही सेटवर असो वा शूटिंग संपल्यावर खूप गप्पा मारतो, मला तिच्या रूपात चांगली मैत्रीण मिळाली असं म्हणेन मी. कधी कधी अतिशा ताई आम्हाला (लहान मुलांना) गोष्टी सांगते. आम्ही सगळेच घरापसून लांब आहोत, पण ती इतकं प्रेम वाटते की आम्हा सर्व कलाकारांना आईची कमतरता भासत नाही.” अक्षयाने पुढे सांगितले.

हेही वाचा - ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत संजू, रणजीत आणि कुसुमावतीमधील अबोला करणार दूर

हेही वाचा - ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेते कश्यप परुळेकर साकारणार नेतोजी पालकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.