ETV Bharat / sitara

कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा हा सुपरस्टार असणार पहिला पाहुणा, शोची तारीख जाहीर - 'द कपिल शर्मा शो -3'

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो -3' सह प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. शोच्या आधी प्रोमो आणि काही फोटो प्रसिध्द झाले आहेत. या शोचा पहिला पाहुणा कोण असेल यावरचा पडदा उचलण्यात आलाय.

Kapil Sharma's comedy show
'द कपिल शर्मा शो -3'
author img

By

Published : Aug 5, 2021, 11:01 PM IST

मुंबई - प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो -3' सह प्रेक्षकांना गुदगुल्या करण्यासाठी येत आहे. शोच्या आधी प्रोमो आणि काही फोटो प्रसिध्द झाले आहेत. या शोचा पहिला पाहुणा कोण असेल यावरचा पडदा उचलण्यात आलाय.

कपिल शर्माचा शो सर्वात जास्त पाहिला जातो तो शोमध्ये येणाऱ्या बॉलिवूडसह लोकप्रिय सेलेब्रिजीमुळे. कपिलच्या शोमध्ये प्रेक्षकांना बॉलिवूड स्टार्सना जवळून जाणून घेण्याची संधी मिळते. त्याच वेळी, बॉलिवूड सेलेब्रिटीज चित्रपट प्रमोशनसाठी शोमध्ये येतात आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अनेक धक्कादायक आणि मजेशीर खुलासे करतात.

याच कारणामुळे कपिल शर्माचा हा कॉमेडी शो गेल्या आठ वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. अशा परिस्थितीत हा शो पुन्हा एकदा ऑन एअर होणार आहे. शोचा हा तिसरा सीझन आहे आणि शोचे दोन्ही सीझन टीआरपी यादीत हिट ठरले आहेत.

कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सिझनचा पहिला पाहुणा

कपिल शर्मा आपल्या कॉमेडी शोच्या तिसऱ्या सीझनची सुरुवात अक्षय कुमारच्या साक्षीने होणार आहे. शोच्या पहिल्या भागात अक्षय कुमार त्याच्या 'बेल बॉटम' या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. अक्षय कुमारचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कपिलचा हा नवा शो 21 ऑगस्टपासून ऑन एअर होणार आहे.

अक्षयने घेतला कपिलचा क्लास

अलीकडेच, अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांच्यात ट्विटरवर एक मजेशीर चकमक पाहायला मिळाली. खरेतर, कपिलने एक ट्विट केले आणि अक्षय कुमारच्या आगामी 'बेल बॉटम' या चित्रपटाचे कौतुक केले, पण खिलाडी कुमारने कपिलचा क्लास घेतला होता.

अक्षयने दिली कपिलला धमकी

आपल्या ट्विटमध्ये कपिलने 'बेल बॉटम' च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले होते आणि हे रिट्विट करत अक्षय कुमारने लिहिले, ''मी शोमध्ये येतोय हे कळताच शुभेच्छा पाठवल्यास, त्याआधी नाही, भेट मग बघतो."

हेही वाचा - B'day Spl: अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती काजोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.