ETV Bharat / sitara

एक देश, एक स्वप्न, एक इतिहास; अक्षयच्या 'मिशन मंगल'चा टीजर प्रदर्शित

या चित्रपटात अक्षय कुमार वैज्ञानिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अक्षयसोबत विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा यांसारखी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे.

एक देश, एक स्वप्न, एक इतिहास; अक्षयच्या 'मिशन मंगल'चा टीजर प्रदर्शित
author img

By

Published : Jul 9, 2019, 4:04 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'मिशन मंगल' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार वैज्ञानिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अक्षयसोबत विद्या बालन, तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा यांसारखी स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. 'एक देश, एक स्वप्न, एक इतिहास, भारताची मंगळ ग्रहापर्यंत जाण्याची खरी गोष्ट', अशी टॅगलाईन देत अक्षयने या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'मिशन मंगल'च्या टीजरमध्ये सर्व कलाकरांची झलक पाहायला मिळते. टीजरच्या सुरुवातीलाच सॅटेलाईट्स दाखवण्यात आले आहेत. शेवटी रॉकेट अवकाशात उड्डाण घेताना पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. 'मिशन मंगल' ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे, असे अक्षयने सांगितले होते. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अक्षयच्या 'मिशन मंगल'ची टक्कर प्रभासच्या 'साहो' आणि जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'सोबत होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता नवा पेच निर्माण झाला आहे. अशात आता प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला प्रतिसाद देतात, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.