मुंबई - अनेक कलाकार भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतात. सलमान खान ने ‘सुलतान’ साठी तर आमिर खान ने ‘दंगल’ साठी वजन कमी-जास्त केले. ‘गजनी’ साठी तर आमिरने त्याचे केस एकदम बारीक कापले होते. मराठीमध्ये आता अजिंक्य देवनेही ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतील भूमिकेसाठी आपल्या केसांना कात्री लावलीय. त्याने तर चक्क ‘चमनगोटा’ केलाय. थोडक्यात आपले मराठी कलाकार हिंदी कलाकारांच्या तुलनेत ‘केस’भरही मागे नाहीत.
अजिंक्य देव साकारतोय बाजीप्रभू देशपांडे, भूमिकेसाठी केला ‘चमनगोटा’! - new marathi serail
सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक होतेय ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतून ज्यात ते बाजीप्रभू देशपांडेच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांमध्ये ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. बाजीप्रभू देशपांडे हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी अजिंक्य देव खूपच उत्सुक आहेत.
बाजीप्रभू देशपांडे