मुंबई - कोरोना विषाणूमुळे देशात सध्या संपूर्ण जनता भीतीच्या दहशतीखाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्स आणि संपूर्ण वैद्यकिय कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांनाही या कोरोना विषाणूची शिकार व्हावे लागत आहे. दरम्यान काही डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्याशी करण्यात आलेल्या या गैरवर्तणूक प्रकरणी अभिनेता अजय देवगणने ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
सुशिक्षित लोकांनी डॉक्टरांशी असा व्यवहार करणं हे खूप घृणास्पद आहे. असे असंवेदनशील लोक खरे गुन्हेगार असतात, असे अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
अजय देवगनच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
DISGUSTED & ANGRY to read reports of “educated” persons attacking doctors in their neighbourhood on baseless assumptions. Such insensitive people are the worst criminals😡#StaySafeStayHome #IndiaFightsCorona
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">DISGUSTED & ANGRY to read reports of “educated” persons attacking doctors in their neighbourhood on baseless assumptions. Such insensitive people are the worst criminals😡#StaySafeStayHome #IndiaFightsCorona
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 12, 2020DISGUSTED & ANGRY to read reports of “educated” persons attacking doctors in their neighbourhood on baseless assumptions. Such insensitive people are the worst criminals😡#StaySafeStayHome #IndiaFightsCorona
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 12, 2020
यापूर्वी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील एका व्हिडिओद्वारे डॉक्टरांसोबत होणाऱ्या गैरव्यवहारा प्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. तर, अभिनेता आमिर खानने देखील एका पोस्टद्वारे या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला होता.
देशात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागच्या २४ तासात ९०९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही ८३५६ वर पोहचली आहे.