मराठी चित्रपटसृष्टीमध्ये रोमँटिक भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या स्वप्नील जोशीने ‘समांतर’ या वेब सिरींजमधून आपल्या ‘रोमँटिक’ इमेजला फाटा देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वीही झालाय. ’समांतर २’ हे वेब सिरीज सुद्धा प्रेक्षकांना आवडतेय आणि त्यातील काहींना ‘थँक यू’ म्हणण्यासाठी तो थेट पोहोचला, रेडिओ सिटी पुणेचा लोकप्रिय कार्यक्रम, 'स्टार कट्टा विथ आरजे शोनाली' मध्ये. आरजे ‘शो शो शोनाली’ सोबत गप्पागोष्टी करताना स्वप्नील जोशीने 'समांतर' आणि त्याचा सीक्वेल 'समांतर २' संबंधित काही रोचक तथ्ये व किस्से, तसेच बदलती शैली आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मार्गांबाबत सांगितले.
दशकापूर्वी सुरू झालेला शो 'स्टार कट्टा विथ आरजे शोनाली'मध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रख्यात सेलिब्रिटीज त्यांचे चित्रपट, सह-कलाकार, क्षेत्रामधील प्रवास, जीवन अशा अनेक गोष्टींसंबंधित रोचक तथ्ये व किस्से सांगतात. विक्रम गोखले, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव यांसारख्या दिग्गज कलाकारांसह सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, अमृता खानविलकर, रिंकू राजगुरू, प्रिया बापट, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांद्रकर, वैथव तत्त्ववादी अशा सेन्सेशनल कलकारांनी त्यांचे माहितीपूर्ण संवाद व मजेशीर गमतीजमतींसह स्टार कट्टाला घराघरामध्ये लोकप्रिय केले आहे.
स्वप्नील जोशीने त्याच्या वेब पदार्पणासाठी गडद व लक्षवेधक 'समांतर'मध्ये काम करण्यास होकार दिल्यानंतर कोरोना महामारीदरम्यान शूटिंग करण्याची रिस्क, तो प्रदर्शित झाल्यावर त्याच्या करिअरला मिळालेली कलाटणी, त्याच्या नेहमीच्या रोमँटिक भूमिकांना झुगारून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न, तसेच दुस-या पर्वासाठी कुमार महाजन ही आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारण्याचा दबाव याबाबत विस्तारीतरित्या सांगितले. स्वप्नीलने प्रेक्षकांच्या समजामध्ये बदल केलेल्या आणि त्यांच्यासाठी नवीन मार्ग खुले केलेल्या शोचे आभार व्यक्त केले आणि त्याला वेगळ्या स्वरूपात स्वीकारल्याबद्दल प्रेक्षकांचेही आभार मानले. मुख्य म्हणजे ‘समांतर २’ ला अमराठी प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतोय.
‘समांतर २’ मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेतही उपलब्ध करण्यात आला आहे. हा धागा पकडत रेडियो सिटीचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर श्री. कार्तिक कल्ला म्हणाले, ''वेब कन्टेन्टमध्ये वाढ आणि व्यापक प्रमाणात डबिंगसह मराठी चित्रपटसृष्टी आता भाषिक मर्यादा दूर करत आहे आणि नॉन-मराठी भाषिक प्रेक्षकांमध्ये देखील मराठी चित्रपटांप्रती आवड निर्माण होत आहे. आपल्या सर्वोत्तम अभिनयासाठी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ओळखल्या जाणा-या प्रख्यात कलाकारांनी रेडिओ सिटीचा शो स्टार कट्टाला मागील दशकापासून पुण्यातील घराघरामध्ये लोकप्रिय केले आहे याचा आनंदच आहे.''
हेही वाचा - इटलीच्या ५१व्या ‘जीफोनी’ चित्रपट महोत्सवात ‘येरे येरे पावसा’ची झाली निवड!