नेहाने सोशल मीडियावरुन एक प्रकारे हिमांशला दम देणारी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर हिमांशने याला उत्तर आपल्या पोस्टमधून दिलंय. अर्थात हिमांशनेही नेहासारखीच पोस्ट लिहिताना थेट नावाचा उल्लेख केलेला नाही. परंतु हे नेहाच्या पोस्टला उत्तर असल्याचे संदर्भ लक्षात घेतले तर लक्षात येते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हिमांशने इन्स्टाग्रामवर एक आनंदी फोटो शेअर करीत लिहिलंय, ''लोक काय विचार करतील याचा विचार न करता, फक्त एकच गोष्ट तुम्हाला खूश ठेवू शकते ती म्हणजे तुम्ही जसे आहात तसे रहा.'' यात त्याने कुठेही नेहाचे नाव घेतलेले नाही. परंतु तिने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टला त्याने दिलेले हे उत्तर आहे.
नेहाने हिमांशला दम देणारी पोस्ट लिहिली होती. नेहाने लिहिलंय, ''लव्ह यु गुड्डू. ईश्वराच्या दयेने माझ्या जवळ प्रत्येक गोष्ट आहे जी हवी असते. मी आनंदी आयुष्य जगत आहे. याचे एकमेव कारण चांगले कर्म आहेत. जे लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात ते माझ्यावर जळणारे खोटारडे आहेत.''नेहाने पुढे लिहिलंय, ''प्रसिध्दी मिळवण्यासाठी तो माझ्या नावाचा वापर करत आहे. पूर्वीही वापर केलाय आणि माझ्या माघारीही करतोय. ओय ! माझ्यामुळे नाही...तर आपल्या कामाच्या जीवावर प्रसिध्द हो. पुन्हा प्रसिध्द होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करु नकोस..नाहीतर मी तुझ्या आई, बहिण आणि पापाने जे काही त्यांनी माझ्यासोबत केले आणि म्हटले त्या कर्मांचेही भांडाफोड करेन. मी तुला इशारा देते की माझ्या नावाचा वापर करु नको आणि जगाच्यासमोर फार बिच्चारा होण्याचा प्रयत्नही करु नको. मला व्हिलन बनवण्याचा प्रयत्न करु नको. माझ्यापासून आणि माझ्या नावापसून दूर रहा.''
नेहा आणि हिमांशच्या ब्रेकअपनंतर अलिकडे एका मुलाखतीत हिमांश म्हणाला होता, ''अशा बऱ्याच गोष्टी त्यावेळी घडल्या होत्या त्याचा उल्लेख मला करायचा नाही. इतकेच सांगू शकतो की तिला हे नाते पुढे वाढवायचे नव्हते. म्हणून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.''
हिमांश कोहली बूँदी रायता या आगामी चित्रपटात काम करीत आहे. 'बूँदी रायता' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रसिध्द करण्यात आले आहे. हिमांश कोहली, सोनाली सैगल आणि रविकिशन यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन कमल चंद्रा करत आहेत. मंगळवारी अंधेरीतील सन सिटीमध्ये या चित्रपटाचा फर्स्टलूक जारी करण्यात आला. या चित्रपटाचा मूहुर्तही पार पडला आहे.