मुंबई - गायक संगीतकार अदनान सामीना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे त्याने जबाबदारी वाढल्याचे म्हटलंय. सामी म्हणाले, ''हे खरोखर अनमोल आहे. जेव्हा तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळतो तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. आता मी अधिक प्रयत्न करण्यासाठी आणि जास्त चांगले करण्यासाठीच्या दिशेने मला जबाबबदारीची जाणीव आहे.''
अनेक राजकीय पक्षांनी आणि तमाम लोकांनी सामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावरुन टीका केली होती. लोकांच्या मते देशाचे संबंध पाकिस्तानसोबत चांगले नसताना मुळ पाकिस्तानी असलेल्या अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार देणे योग्य नाही.
काहींच्या मते भारतात असे अनेक संगीतकार आहेत की ज्यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सामी या टीकेमुळे चिंतीत नाही.
मुंबईत आपल्या तू याद आया गाण्याच्या लॉन्चिंगच्यावेळी सामी यांनी सांगितले, ''जर कोणाला हे आवडले नसेल तर हरकत नाही. मी त्यांना माफ केलं. ते बिच्चारे लोक आहेत आणि त्यांना यातून शिकायला मिळेल. ''
''जर काही मोजक्या लोकांना आवडलं नसेल तर याचा फरक पडत नाही. कारण १३० कोटी लोकांना हे आवडलंय, तर हे कोण आहेत? यांना लांबच ठेवले पाहिजे.''
अदनान पुढे म्हणाले, ''सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या क्षेत्रात मला हा पुरस्कार मिळालाय ते कला आणि संगीत आहे. माझ्या प्रशंसकांच्या प्रती माझ्या जाबाबदारीची मला जाणीव आहे. माझा देश माझा पेशा आहे, जे संगीत आहे.''
सामी यांनी पुढे म्हटलंय, ''म्हणून एक जबाबदार नागरिक या नात्याने माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट संगीत देण्याचा प्रयत्न करण्याची माझी जाबाबदारी मला सुनिश्चित करायची आहे.''