मुंबई - आपला संपूर्ण समाज संगीतप्रिय आहे. प्रत्येक समारंभात संगीत हा अविभाज्य भाग असतो. त्यामुळेच चित्रपटसंगीताबरोबरच सिंगल्स बनत असतात व अलीकडच्या काळात त्यांचे व्हिडीओ म्युझिक अल्बम्स बनत असतात. तर असाच एक नवीन म्युझिक अल्बम येतोय ज्यात ‘लागीर झालं जी’ फेम शिवानी बावकर ‘लग्नाची पिपाणी’ वाजवताना दिसणार आहे. म्हणजे ती प्रत्यक्ष ‘पिपाणी’ वाजवणार नसून त्यात अभिनय करताना दिसणार आहे. ही शिवानी बावकरची ‘लग्नाची पिपाणी' सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसणार आहे.
शिवानी बावकर वाजवतेय ‘लग्नाची पिपाणी'! - ‘लग्नाची पिपाणी' अल्बममध्ये शिवानी बावकर
एक नव्या म्यूझिक अल्बममध्ये अभिनेत्री शिवानी बावकर झळकणार आहे. तिचा ‘लग्नाची पिपाणी' हा अल्बम सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसणार आहे.