ETV Bharat / sitara

अभिनेत्री पूजा कातुर्डेने ‘डॉग कॅफे’मध्ये साजरा केला प्रेमाचा दिवस - डॉग कॅफेमध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे

प्रत्येकजण व्हॅलेन्टाईन्स डे ला खास व्यक्ती सोबत वेळ घालवतो, त्याला स्पेशल गिफ्ट देतो पण अभिनेत्री पूजा कातुर्डेन यावेळी व्हॅलेंटाईन डेचं स्वतःलाच गिफ्ट दिलं. पूजानं डॉग कॅफेमध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला.

पूजा कातुर्डे
पूजा कातुर्डे
author img

By

Published : Feb 15, 2022, 5:52 PM IST

अभिनेत्री पूजा कातुर्डे हिला आपण ‘अहिल्याबाई होळकर’ या मालिकेमुळे ओळखतो. तिने हिंदी मालिका ‘भाकरवाडी’ मध्ये सुद्धा भूमिका केली होती. अलिकडे पार पडलेल्या व्हॅलेंटाईन डेला ती कोणत्या डेटवर होती याबद्दल तिला विचारण्यात आले होते. कारण सर्वसाधारणपणे लोकांच्या मते हा एक प्रेम दिवस असून त्यादिवशी आपल्या प्रेमाच्या व्यक्तींसोबत तो घालवावा असा प्रघात आहे.

आपल्याकडेही व्हॅलेन्टाईन्स डे जोरात साजरा केला जातो. प्रत्येकजण व्हॅलेन्टाईन्स डे ला खास व्यक्ती सोबत वेळ घालवतो, त्याला स्पेशल गिफ्ट देतो पण अभिनेत्री पूजा कातुर्डेन यावेळी व्हॅलेंटाईन डेचं स्वतःलाच गिफ्ट दिलं. पूजानं डॉग कॅफे मध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला.

''खरंतर व्हॅलेंटाईन डे ला रोमँटिक डेटवर जायचं सगळ्यांचं स्वप्न असतं. पण माझ्यासाठी माझे व्हॅलेंटाईन हे छोटे प्राणी बनले. मला लहानपणापासून प्राण्यांची आवड आहे. माझ्या घरीही दोन मांजरी आहेत. त्यांच्यासोबत माझा प्रत्येक दिवसच व्हॅलेंटाईन असतो. पण या खास दिवसातही मी ‘डॉग कॅफे’ मध्ये गेले होते आणि तिकडेही मला खूपच मजा आली. हे प्राणी आपल्यावर किती निरपेक्ष प्रेम करतात. यांच्यासोबत माझा खास बॉण्ड पण तयार झाला. मला प्राण्यांसाठी जितकं काही करता येईल, तितकं करायचंय'', असं पूजाने यावेळी सांगितलं.

हेही वाचा - 'गंगुबाई काठियावाडी'च्या वर्ल्ड प्रीमियरसाठी आलिया भट्ट बर्लिनला रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.