ETV Bharat / sitara

‘मला आणि श्रीदेवीला एका खोलीत कोंडून देखील आम्ही एकमेकींशी एक शब्दही बोललो नाही’! - अभिनेत्री जया प्रदा लेटेस्ट बातमी

बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांनी एका कार्यक्रमानिमित्त दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची आठवण काढली. त्यावेळ त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Jaya Prada
Jaya Prada
author img

By

Published : Apr 22, 2021, 3:04 PM IST

मुंबई - एका चित्रपटात दोन टॉपच्या हिरॉइन्स एकत्र काम करीत असतील तर निर्माता-दिग्दर्शक यांची झोप उडालेली असते, असे गंमतीने म्हटले जाते. आताच्या व्यावसायिकतेच्या काळात हिरॉइन्स एकमेकींशी सौजन्याने वागत आपले काम पूर्ण करतात. परंतु, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आणि त्याअगोदर असे पाहायला मिळत नसे. दोन्ही हिरॉइन्स प्रत्येक गोष्टीत एकमेकींवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत, त्यामुळे कधी-कधी चित्रपटावरदेखील याचा परिणाम होत असत. त्याकाळी जया प्रदा आणि श्रीदेवी या टॉपच्या हिरॉइन्स होत्या. दोघींतून विस्तवही जात नसे. आता, श्रीदेवी या जगात नाहीत. नुकतीच एका कार्यक्रमामध्ये जया प्रदाने त्यांची आठवण काढली.

जया प्रदा इंडियन आयडॉल-12च्या भागात आपल्या जीवन प्रवासातील काही किस्से प्रेक्षकांना सांगणार आहेत. त्या म्हणाल्या, ‘माझ्यात आणि श्रीदेवीमध्ये कधीच भावनिक नाते नव्हते. सेटवर आम्ही कधीही एकमेकींशी बोललो देखील नाही. श्रीदेवी ही बॉलीवूडमधली माझी सर्वात मोठी प्रतिस्पर्धी नायिका होती. त्यामुळे आमच्यात कधी सख्य झाले नाही.' जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा प्रत्येक वेळी आमचा एकमेकींशी परिचय करून दिला जाई. आम्ही फक्त एकमेकींना ‘नमस्ते’ म्हणून निघून जायचो.

'मकसद' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जितेंद्रे आणि राजेश खन्ना या दोघांनी मिळून जयाप्रदा व श्रीदेवीला एका मेकअप रूममध्ये एक तास कोंडून ठेवले होते. मात्र, तरीही दोघी एकमेकींशी एक शब्दही बोलल्या नाहीत आणि त्यानंतर सगळ्यांनी त्यांच्यासमोर हात टेकले. आज श्री आपल्यात नाही. मात्र, मला तिची खूप आठवण येते, असे जयाप्रदा म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.