ETV Bharat / sitara

अमृता पवार म्हणाली, “‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’चे कथानक खूपच रिलेटेबल'' - ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं’

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं’ या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

Amrita Pawar
अमृता पवार
author img

By

Published : Aug 5, 2021, 5:28 PM IST

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनंतर मनोरंजनसृष्टी सावरतेय. सरकारकडून म्हणावी तेव्हडी मदत मिळत नसली तरी फिल्म इंडस्ट्रीतील मंडळी एकमेकांचा हात धरून सावरत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनाला प्राधान्य देत टेलिव्हिजन वाहिन्या नवीन कार्यक्रम घेऊन येत आहेत. झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं’ असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या प्रोमोमध्ये अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नाव लक्षात ठेवताना दिसतेय. या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

Amrita Pawar
अमृता पवार

या मालिकेबद्दल बोलताना अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, "मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारते त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करतील त्यांना ही ती खूप आवडेल याची मला खात्री आहे."

३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहे.

हेही वाचा - उमेश कामत म्हणतो, ‘प्रत्येक कपलने एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.