मुंबई - आज पासून नाट्यगृह सुरू झाली असली तरी यात ५० टक्केच प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. आधीच नाटकांकडे प्रेक्षकांचा कल कमी झाला आहे. त्यात कोरोना नंतर नाट्यगृहांकडे प्रेक्षक जाणे कठीण होणार आहे. यासाठी नाट्य प्रेक्षकांना पुन्हा नाट्यगृहांकडे वळविण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी नाट्य कलाकारच आता रस्त्यावर उतरले आहेत. भांडुपच्या कलाकार कट्ट्यामधील कलाकारांनी आज चौका चौकात जाऊन पथनाट्य सादर केली.या पथनाट्य मधून सध्या नाट्यगृहांची, आणि नाट्यकलाकारांची स्थिती या वर भाष्य केले गेले या पथनाट्याच्या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी..
राज्यात अखेर नाट्यगृहांमध्ये तिसरी घंटा वाजली आहे आणि यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना खुर्च्यांवर खिळवून ठेवण्यासाठी कलाकारांना देखील आपल्या अभिनयाचा कस लावायला सुरुवात केली आहे यासाठी कलाकारांनी त्यांच्या रंगीत तालीम देखील सुरुवात केली आहे . गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळामुळे नाट्यगृहाचे पडदे बंद होते. अनेक व्यावसायिक रंगभूमीवरील कलाकारांवर आर्थिक विवंचना होतीच शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मकडे प्रेक्षकांचा कल वाढलेला पाहायला मिळाला त्यामुळे अखेर लवकरात लवकर रंगभूमी चे पडदे उघडले जावेत अशी मागणी कलाकारांकडून होऊ लागली आणि राज्य सरकारने काही नियमावली जारी करत 22 ऑक्टोंबरपासून सिनेमागृह आणि रंगभूमीसाठी परवानग्या देण्यात आल्या त्यामुळे अखेर कलाकारांनी आपली मरगळ झटकत जोरदार नाटकांच्या रिहर्सलला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी पण नाट्यगृह आणि सिनेमागृह जावे यासाठी आज भांडुप कलाकार पथ नाट्यचा माध्यमातून जनजागृती करण्यात आली. लोकांना जास्तीत जास्त सिनेमा गृह आणि नाट्यगृहात जाण्याचे आवाहन करण्यात आले.
गेल्या दीड वर्षापासून व्यवसायिक नाटक बंद आहेत. अखेर तिसरी घंटा वाजली आहे. कलाकारांची मोठी गळचेपी या दिवसांमध्ये झाली होती शेवटी नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्ही ही मरगळ झटकून तयारीला लागलो आहोत प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी नाट्यगृह आकडे यावे असे नाट्य निर्माता निलेश गुंडाळे यांनी सांगितले.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : "सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला", म्हणत कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव