ETV Bharat / sitara

अभिनेते शरद पोंक्षे यांचे वेबसिरीजमध्ये पदार्पण!

author img

By

Published : Mar 16, 2021, 4:24 PM IST

अभिनेता शरद पोंक्षे यांनी कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाला सुरूवात केली आहे. रंगमंच आणि चित्रपटाच्या पडद्यावर लीलया वावरलेले पोंक्षे आता वेब सिरीजमध्ये झळकणार आहेत. त्यांचे हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण असेल.

Sharad Ponkshe
शरद पोंक्षे

मुंबई - शरद पोंक्षे यांनी असाध्य रोगावर मात करीत पुन्हा मनोरंजनसृष्टीची सेवा करण्यास सुरुवात केली असून मालिका, चित्रपट, नाटक यातून पुन्हा पूर्वीप्रमाणेच कडक परफॉर्मन्सेस देण्यास सुरुवात केली आहे. आता ते वेब सिरीजमध्ये सुद्धा पदार्पण करीत आहेत. ही सहा भागांची वेबसिरीज एक कौटुंबिक कथा असून ती बघताना हे कुठेतरी आपल्याही घरात घडतंय, याची प्रेक्षकांना जाणीव होईल आणि त्यामुळेच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. या वेबसिरीजच्या निमित्ताने शरद पोंक्षे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.

या वेब सिरीजची निर्मिती, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना दर्जेदार आणि आशयपूर्ण कार्यक्रम देण्याची हमी देणाऱ्या, प्लॅनेट मराठी या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या बॅनरखाली झाली असून या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा नुकताच मुंबईत शुभारंभ झाला. या वेबसिरीजचे नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे. असे असले तरी यातील कलाकारांची नावे मात्र जाहीर करण्यात आली आहेत. शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही वेबसिरीज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे.

‘वर्जिनोशन्स’ ची प्रथम निर्मिती असणाऱ्या या वेबसिरीजचे निर्माते आहेत प्रतीक व्यास आणि अमित कान्हेरे. तसेच या वेब सिरीज चे दिग्दर्शन अमित कान्हेरे करीत असून योगेश विनायक जोशी यांनी संवादलेखन केले आहे. विशाल संगवई डीओपीचे काम पाहिले असून ओंकार महाजन क्रिएटीव्ह प्रोड्युसर आहेत. रोहन-रोहन यांनी या वेबसिरिजला संगीत दिले आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीला ‘सोनीयाचे दिवस’ आणण्याचे स्वप्न पाहणारे व त्यासाठी झटणारे प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ''या वेब सिरीजचा विषय तसा गंभीरच. परंतु प्रेक्षकांना मनोरंजनही मिळावे या उद्देशाने आम्ही अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. आम्ही आजवर हाताळलेल्या विषयांपेक्षा हा जरा वेगळाच विषय आहे. ही वेबसिरीज प्रेक्षक आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडू शकतात. यात अनुभवी व नवीन कलाकारांची निवड झाली असून अभिनयात पूर्ण मुरलेल्या या कलाकारांनी आपापल्या भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे.''

हेही वाचा - ऑस्कर २०२१ नामांकनाची संपूर्ण यादी : 'द व्हाईट टायगर'चा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.