ETV Bharat / sitara

अभिषेक बच्चनचा 'ब्रिथ' मालिकेतला सहकारी अमित साधची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह - अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमित साधने स्वतःची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अमित आणि अभिषेक बच्चन यांनी 'ब्रिथ - इन टू द शॅडो' या वेब सिरीजमध्ये एकत्र काम केले आहे. या मालिकेचे डबिंग त्यांनी एकत्र केले होते.

Amit Sadh tests COVID-19 negative
अमित साधची कोरोना चाचणी
author img

By

Published : Jul 13, 2020, 3:24 PM IST

मुंबईः अभिनेता अमित साधने सोमवारी सांगितले की आपण कोरोना व्हायरसबद्दलची चाचणी केली असून अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रार्थना केलेल्या सर्व चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.

अमितने रविवारी ट्विट करुन सांगितले की त्याची तब्येत चांगली असून सावधगिरीचा भाग म्हणून त्याने कोरोनाची चाचणी केली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अमितने स्वतःची चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

अमित आणि अभिषेक बच्चन यांनी 'ब्रिथ - इन टू द शॅडो' या वेब सिरीजमध्ये एकत्र काम केले आहे. या मालिकेचे डबिंग त्यांनी एकत्र केले होते.

  • Thank you for your prayers and concerns. This is the only time I say happily I am negative. To all people battling this, my prayers and thoughts continue. Love you. Togetherness is the only strength ! 🙏🏻

    — Amit Sadh (@TheAmitSadh) July 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

''तुम्ही चिंता बाळगून प्रर्थना केल्याबद्दल तुमचे आभार. ही अशी वेळ आहे की मी निगेटिव्ह आहे हे सांगताना आनंद होतोय. या संकटाशी सामना करणाऱ्या सर्वांसाठी माझी प्रर्थना. एकत्र असणे ही सर्वात मोठी शक्ती आहे,'' असे अमित साधने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे..

हेही वाचा - आई आयसोलेशनमध्ये तर भावाचे कुटुंबीय होम क्वारंटाईनमध्ये - अनुपम खेर

अमिताभ यांची सून ऐश्वर्या आणि नातू आराध्या यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ज्येष्ट अभिनेत्री आणि अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

अमिताभ यांनीही रविवारी ट्विट करुन प्रार्थना आणि काळजी करीत असलेल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

मुंबईमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. रविवारी कोरोनाचे १२६३ रुग्ण आढळून आले. मुंबईच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९२ हजार ७२० झाली असल्याचे बीएमसीने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.