ETV Bharat / sitara

उत्कंठा वाढवणारा रोमांचक 'ब्रीद : इन टू द शॅडोज्'चा टिझर रिलीज - ब्रीद : इन टू द शॅडोज्

अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या पदार्पणाच्या 'ब्रीद : इन टू द शॅडोज्' या वेब-सीरिजचा रोमांचक टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हीडिओत एक मुलगी आणि वडील यांच्यातील अतूट नाते दाखवण्यात आले आहे. या शोचा लोगोही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Breathe into the Shadows
अभिनेता अभिषेक बच्चन
author img

By

Published : Jun 22, 2020, 1:17 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहे. त्याची 'ब्रीद : इन टू द शॅडोज' ही नवी वेब सीरिज रिलीज होत आहे. याचा टिझर प्रसिद्ध झाला असून प्रेक्षकांनी त्याला पसंती दिल्याचे दिसते.

'ब्रीद : इन टू द शॅडोज्' बेव-सीरिजचा टिझिर फादर्स डेच्या निमित्ताने रिलीज करण्यात आला. या वेब-सीरिजमध्ये मुलगी आणि वडील यांच्या नात्याची गोष्ट पाहायला मिळणार आहे. टिझरच्या बॅकग्राऊंडमध्ये अभिषेकचा आवाज ऐकाला मिळतो.

ही वेब-सीरिज मयंक शर्माने दिग्दर्शित केली आहे. भवानी अय्यर, अरशद सैयद, मयंक शर्मा आणि विक्रम टुली यांनी ही सीरिज लिहिली आहे.

अमॅझॉन प्राइमवर स्ट्रीम होणारी ही वेब सीरिज २०१८मध्ये आलेल्या 'ब्रीद' या सीरिजचा सिक्वल आहे. यात आर. माधवनने आणि अमित साध यांनी आघाडीच्या भूमिका साकारल्या होत्या. या सीझनमध्येही अमित साध प्रमुख भूमिकेत आहे.

अभिषेक बच्चनने तरुण अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला आणि इन्स्टाग्रामवर लिहिले, 'नेहमी सर्वात कूल...पिरीयड...#हॅप्पीफादर्सडे @amitabhbachchan.'

आगामी काळामध्ये अभिषेक अनुराग बसू यांच्या 'लुडो' या चित्रपटात झळकणार आहे. २४ एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. त्यासोबतच कुकी गुलाटी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द बिग बुल' या चित्रपटातही तो झळकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.