ETV Bharat / sitara

आदर्श शिंदेंच्या भारदस्त आवाजातील 'आपलीच हवा' गाणे रिलीज! - song sung by Adarsh ​​Shinde

प्रशांत नाकती निर्मीत 'आपलीच हवा' गाणं नुकतचं रीलीज झालं. या गाण्यात ग्रामीण भागातील निवडणूकीचं हुबेहूब दर्शन घडवलं आहे. आपलीच हवा या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार प्रशांत नाकती आहे. तर गायक आदर्श शिंदे आणि गायिका सोनाली सोनावणे हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत.

'आपलीच हवा' गाणं नुकतचं रीलीज
'आपलीच हवा' गाणं नुकतचं रीलीज
author img

By

Published : Mar 12, 2022, 5:31 PM IST

सध्या म्युझिक व्हिडीओज ची चालती आहे. प्रतिष्ठित गायक गायिका सुद्धा आता ‘सिंगल्स’ च्या प्रेमात आहेत. सध्या महाराष्ट्रात निवडणूकांचे वारे वाहत आहेत त्याच पार्श्वभूमीवर 'नादखुळा म्युझिक' रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मीत 'आपलीच हवा' गाणं नुकतचं रीलीज झालं. या गाण्यात ग्रामीण भागातील निवडणूकीचं हुबेहूब दर्शन घडवलं आहे. आपलीच हवा या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार प्रशांत नाकती आहे. तर गायक आदर्श शिंदे आणि गायिका सोनाली सोनावणे हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात संजना पंडीत, विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळे, सचिन कांबळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र 'आपलीच हवा' गाण्याची चर्चा आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मिलेनीयर' म्हणून ओळख असणा-या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची 'पोरी तुझ्या नादानं, माझी बायगो, लाजरान साजरा मुखडा, मी नादखुळा, आपली यारी अशी एकाहून एक भन्नाट गाणी तुफान व्हायरल झाली. प्रेमकहाणी सोबत सामाजिक विषय देखील त्यांच्या गाण्यात दिसून येतात.

प्रशांत नाकती म्हणाला की, "महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. त्यांची साथ गायिका सोनाली सोनावणे हीने दिली आहे. याआधी आदर्श दादाने गायलेली 'मी नादखुळा'आणि 'आपली यारी' ही दोन गाणी सुपरहीट झाली. तसंच दादासोबतचं हे तिसरं गाणं आहे. त्यामुळे मी फार उत्सुक आहे."

तो पुढे म्हणाला, "सध्या महाराष्ट्रात निवडणूकांचा माहोल आहे. या निवडणूकांमध्ये तरूण वर्ग प्रचार करताना दिसतोय. पण जेव्हा उमेदवारपदाची वेळ येते, तिथे कोणतीच तरूण मंडळी दिसत नाही. आपल्या भारतात निम्याहून अधिक युवा आहेत. मग आपला तरूण वर्ग उमेदवारीसाठी पुढे का येत नाही? त्यांच्यात क्षमता आहे तर ते राजकारणात का उतरत नाही? हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तरूण नेते या देशात आहेत. 'आपलीच हवा' हे गाणं लिहीताना माझ्या डोक्यात हे सर्व विषय होते. आणि मी ते गाण्यामार्फत मांडले."

गाण्याच्या चित्रीकरणाविषयी प्रशांतने सांगितले की, "गाण्याचं चित्रीकरण हे नाशिकमधील मोहाडी या गावात झालं आहे. तर गाण्यातील काही दृश्यं आम्ही जानोरी गावात शूट केली आहेत. जिथे आम्ही ‘माझी बायगो’ या गाण्याचं शूट केलं होतं. रोहीत जाधव आणि त्याच्या टीमने सर्व व्यवस्था केली होती. नाशिकमध्ये शूट करताना खूप मजा आली. काही कलाकार आम्ही गावातलेच घेतलेत. त्यामुळे या गाण्याला गावरान लूक मिळाला आहे. दोन दिवसाच्या शूटींगला तीन दिवस लागले. परंतु शूट करतानाचा अनुभव खूप भारी होता."

हेही वाचा - 'बच्चन पांडे' प्रमोशनमधील क्रिती सेनॉनचा आकर्षक लूक पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.