मुंबई - बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान नेहमी वेगवेगळ्या रूपात आणि ढंगात प्रेक्षकांसमोर येत असतो. त्याच्या प्रत्येक भूमिकेत विविधता पाहायला मिळते. यासाठी तो वेगवेगळ्या लूक्सचेही स्वत:वर प्रयोग करत असतो. आता तर त्याने चक्क वयोवृद्ध व्यक्तिचा लूक धारण केला आहे. मात्र, हा लूक कोणत्याही सिनेमासाठी नाही.
आमिर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो वयोवृद्ध व्यक्तीच्या भूमिकेसाठी तयारी करत असल्याचे दिसत आहे. त्याचा हा लूक नेमका कशाप्रकारे साकारला गेला हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. 'लवकरच तुमच्या फोनमध्ये', असे कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्याने हा लूक धारण केला, हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या सरप्राईझची उत्सुकता आहे.
Coming Soon...aapke phone pe... pic.twitter.com/0yoTvs2ji5
— Aamir Khan (@aamir_khan) March 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Coming Soon...aapke phone pe... pic.twitter.com/0yoTvs2ji5
— Aamir Khan (@aamir_khan) March 21, 2019Coming Soon...aapke phone pe... pic.twitter.com/0yoTvs2ji5
— Aamir Khan (@aamir_khan) March 21, 2019
आमिर खान यापूर्वी 'दंगल' चित्रपटात वयोवृद्ध व्यक्तिच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेसाठी त्याने वजन वाढविले होते. मात्र, पूर्णपणे टक्कल असलेल्या व्यक्तिच्या रूपात तो पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. त्याच्या या लूकमुळे तो ओळखायलाही येत नसल्याच्या प्रतिक्रीया चाहत्यांनी दिल्या आहेत.
'मिस्टर परफेक्शनिस्ट' प्रत्येक बाबतीत परफेक्ट असल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आमिरच्या या लूकची चर्चा गाजत आहे.