ETV Bharat / sitara

‘इश्क पर जोर नहीं’ मधील अहान आणि इश्की चे अखेर होतेय लग्न! - सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इश्क पर जोर नहीं’ या लोकप्रिय मालिकेतील अहान आणि इश्की हे दोन प्रेमी अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेरीस आता एकत्र येणार आहेत. अनेक चढउतारांनंतर त्यांच्या प्रेमाची परिणती आता विवाहात होणार आहे. त्या दोघांच्या आयुष्यात अनेक वळणे आणि नाट्य घडून गेल्यानंतर आता ते सुखी सहजीवनासाठी सिद्ध झाले आहेत.

अहान आणि इश्की
अहान आणि इश्की
author img

By

Published : Jun 27, 2021, 8:59 PM IST

मुंबई - लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाला असून लग्नसराईची लगबग सुरू झालेली दिसते. अनेक मालिकांमध्येही सध्या लगीनघाईचे वातावरण आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इश्क पर जोर नहीं’ या लोकप्रिय मालिकेतील अहान आणि इश्की हे दोन प्रेमी अनेक अडथळ्यांच्या शर्यतीनंतर अखेरीस आता एकत्र येणार आहेत. अनेक चढउतारांनंतर त्यांच्या प्रेमाची परिणती आता विवाहात होणार आहे. त्या दोघांच्या आयुष्यात अनेक वळणे आणि नाट्य घडून गेल्यानंतर आता ते सुखी सहजीवनासाठी सिद्ध झाले आहेत. मालिकेचे कथानक, त्यातील व्यक्तिरेखा आणि विशेषतः परम आणि अक्षिता यांची पडद्यावरची केमिस्ट्री यामुळे लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेत आता एक सुखद वळण येणार आहे.

अहान आणि इश्की चे अखेर होतेय लग्न
अहान आणि इश्की चे अखेर होतेय लग्न

‘इश्क पर जोर नहीं’ या मालिकेची निर्मिती ‘४ लायन्स फिल्म्स’च्या बॅनरखाली गुल खान आणि करिष्मा जैन यांनी केली असून त्यात अक्षिता मुदगल आणि परम सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इश्कीची भूमिका करणारी अक्षिता मुदगल म्हणाली, “लग्नाचा सोहळा आणि विधी यांचे शूटिंग करताना आम्हाला खूप मजा आली आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही ते पाहायला आवडेल. अहान आणि इश्कीचे लग्न व्हावे अशी इच्छा असणार्‍या इश्कान फॅन्ससाठी हा प्रतिक्षेचा काळ खूप मोठा होता. आता यापुढे कथानक आणखीन आकर्षक होऊन मनाची पकड घेईल.”

अहान आणि इश्की
अहान आणि इश्की

मालिकेत अहानची भूमिका करणारा परम सिंग #Ishqaan या लोकांच्या लाडक्या जोडीच्या लग्नाबबात स्वतःही तितकाच उत्साहात आहे. तो म्हणतो, “अहान आणि इश्की यांची प्रेमकहाणी पुढच्या टप्प्यावर जावी यास चाहत्यांचे मनापासून समर्थन आहे. इश्कान चाहत्यांसाठी ही अत्यंत सुखद बातमी आहे की, अहान आणि इश्की आता विवाहबद्ध होणार आहेत. या मालिकेला आणि आमच्या व्यक्तिरेखांना, #Ishqaan ला, मिळत असलेले प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. हा खूप सुंदर प्रवास होता. ही दृश्ये शूट करताना आम्हाला खूपच मजा आली. या दोघांचा विवाह ही या मालिकेतील एक ठळक घटना आहे. पण त्यांचा प्रवास इथेच थांबणार नाही. प्रेक्षकांसाठी अजून त्यात बरेच मनोरंजन आणि नाट्य आहे.”

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.