ETV Bharat / sitara

मराठी भाषेचा गौरव साजरा करणारा कार्यक्रम 'गर्जतो मराठी' झी मराठीवर!

author img

By

Published : Feb 25, 2022, 4:54 PM IST

कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त अनेक कार्यक्रम सादर केले जातात ज्यात मराठी भाषेचा आदरसत्कार केला जातो. यानिमित्ताने झी मराठी वाहिनीवर गर्जतो मराठी हा खास कार्यक्रम सादर होणार आहे.

'गर्जतो मराठी' झी मराठीवर
'गर्जतो मराठी' झी मराठीवर

वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त अनेक कार्यक्रम सादर केले जातात ज्यात मराठी भाषेचा आदरसत्कार केला जातो. यावर्षी मराठी भाषेला सरकार दरबारी अभिजात भाषेचा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी झी मराठी हा दिवस साजरा करणार आहे मराठी भाषेचा अभिमान बाळगत, ‘गर्जतो मराठी’ हा विशेष कार्यक्रम प्रसारित करून.

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" या ओळी प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर रुळल्या आहेत. मराठी ही फक्त भाषा नसून जीवन पद्धती झाली आहे. या भाषेला एक अमुल्य वारसा आहे. अशा या वैभवशाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून मराठीचा प्रसार, प्रचार वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येक मराठी मन झगडतंय.

मराठी ही अभिजात भाषा आहे आणि तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळायालाच हवा, यासाठी झी मराठी वाहिनी 'गर्जतो मराठी' हा विशेष कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी सादर करणार आहे. या २ तासाच्या विशेष सांगीतिक कार्यक्रमात नृत्य, सदाबहार मराठी कविता आणि गाणी यांचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर या कार्यक्रमातून मराठी साहित्याचं दर्शन प्रेक्षकांना घडेल. 'अभिजात मराठी जनाभियान' ला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा कार्यक्रम झी मराठी वाहिनी सादर असून या अभियानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कौशल इनामदार यांनी 'अभिजात मराठी गौरव गीत' याची रचना केली आहे जे प्रेक्षकांना या विशेष कार्यक्रमात पाहायला मिळेल.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री गिरीजा ओक आणि हृषीकेश जोशी करणार असून स्पृहा जोशी, संदीप पाठक, किशोर कदम, विभावरी देशपांडे आणि चंद्रकांत काळे यांच्याकडून प्रेक्षकांना दर्जेदार कविता ऐकायला मिळतील. तसेच मंगेश बोरगावकर, हृषीकेश रानडे, केतकी भावे आणि धनश्री देशपांडे यांच्याकडून सदाबहार गाणी आणि मयुरेश पेम, धनश्री काडगावकर, शुभंकर तावडे आणि केतकी पालव या कलाकारांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

'गर्जतो मराठी' हा कार्यक्रम २७ फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

हेही वाचा - पा रंजीथ बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, बिरसा मुंडा बायोपिकची तयारी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.