ETV Bharat / sitara

लॉकडाऊनवर आधारित शॉर्टफिल्म स्पर्धा, ५ निर्माते आले एकत्र - bollywood news

'इंडिया लेट्स मेक ए फिल्म' ही टॅगलाईन वापरुन या निर्मात्यांनी सोशल मीडिया युजर्सला १ मिनटांपर्यंत असलेली फिल्म तयार करण्याचे आवाहन केले आहे. घरीच बसून ही फिल्म तयार करायची आहे. यासाठी ६ वेगवेगळे विषय देण्यात आले आहेत.

5-film-maker-come-togetger-for-lockdown-themed-filmmaking
लॉकडाऊनवर आधारित शॉर्टफिल्म स्पर्धा, ५ निर्माते आले एकत्र
author img

By

Published : Apr 17, 2020, 3:28 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये विविध विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असते. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनवर देखील चित्रपट तयार करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच चित्रपटांच्या शूटिंग बंद असल्यामुळे घरच्याघरी नेटकऱ्यांना सोबत घेऊन शॉर्टफिल्म तयार करण्याची स्पर्धा आयोजीत केली आहे. त्यासाठी कलाविश्वातील ५ आघाडीचे निर्माते एकत्र आले आहेत.

यामध्ये एकता कपूर, साजिद नाडियाडवाला, आनंद एल राय, दिनेश विजान आणि नितेश तिवारी यांचा समावेश आहे.

'इंडिया लेट्स मेक ए फिल्म' ही टॅगलाईन वापरुन या निर्मात्यांनी सोशल मीडिया युजर्सला १ मिनटांपर्यंत असलेली फिल्म तयार करण्याचे आवाहन केले आहे. घरीच बसून ही फिल्म तयार करायची आहे. यासाठी ६ वेगवेगळे विषय देण्यात आले आहेत.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबबातची एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच, फिल्म शूट करण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहनही केले आहे.

या स्पर्धेतील विजेतांची नावे एकता कपूर, साजिद नाडियाडवाला, आनंद एल राय, दिनेश विजान आणि नितेश तिवारी घोषीत करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.