सांगली - अखिल भारतीय नाट्य संमेलन यंदा शताब्दी वर्ष साजरी करत आहे आणि 100 व्या नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा नाट्यपंढरी सांगली मध्ये पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगली मध्ये पत्रकार परिषदेत दिली आहे.
२५ मार्च रोजी तामिळनाडूच्या तंजावर मध्ये नांदीने 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर २६ रोजी सांगलीमध्ये नाटकांचे सादरीकरण होऊन 27 रोजी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ग्रंथदिंडीने या सोहळ्याला सुरवात होणार आहे. या सोहळ्याचे उदघाटन प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,नाट्य संमेलन अध्यक्ष जब्बार पटेल,यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
उदघाटना दिवशी ज्या रंगभूमीवर पाहिली नांदी झाली,ते संगीत नाट्य सीता स्वयंवर सादर होणार आहे. त्यांनंतर 29 मार्च पर्यंत नाट्य, लोककला, सेलिब्रिटी रजनी असे विविध कार्यक्रम पार पडणार असल्याचे,नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले आहे.