मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि नात आराध्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या अमिताभ बच्चन रुग्णालयामध्ये आयसोलेशनमध्ये आपला वेळ घालवत आहेत. अमिताभ यांनी बच्चन कुटुंबीयांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
-
T 3598 - We see your love .. we hear your prayers .. we fold our hands 🙏🙏🙏🙏 .. in gratitude and thanks ! pic.twitter.com/PMMCRMS4FT
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 3598 - We see your love .. we hear your prayers .. we fold our hands 🙏🙏🙏🙏 .. in gratitude and thanks ! pic.twitter.com/PMMCRMS4FT
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 18, 2020T 3598 - We see your love .. we hear your prayers .. we fold our hands 🙏🙏🙏🙏 .. in gratitude and thanks ! pic.twitter.com/PMMCRMS4FT
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 18, 2020
अमिताभ यांनी शेअर केलेला हा फोटो तसा जूना आहे. या फोटोला दिलेल्या कँप्शनमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना व शुभेच्छा दिलेल्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ट्विटरवरून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती झाले आहेत. अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून बच्चन कुटुंबाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. कोलकातामध्ये अमिताभ लवकर बरे व्हावेत यासाठी यज्ञ आणि पूजा करण्यात आली आहे. त्यांच्या चाहत्यांनी या यज्ञाचे आयोजन केले होते. कोलकात्याच्या श्यमाबाजारमध्ये आयोजित केलेल्या या धार्मिक कार्यक्रमात लोकांनी श्रध्देने प्रार्थना केली.
अमिताभ बच्चन यांना 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. कोरोनामुळे हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा 'चेहरा', 'ब्रह्मास्त्र' आणि 'झुंड' हे चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.