मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने आजवर एकापेक्षा एक हिंदी चित्रपट बॉलिवूडला दिले. बॉलिवूडच्या या ग्लॅमरस अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनु्ष्का अभिनेत्रीसोबत एक निर्मातीसुद्धा आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'फक्त चित्रपट पाहणे हे माध्यमांना चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करते असे नाही, तर आयुष्यातील अनुभव हे कथा सांगण्यास आणि सादर करण्यास मदत करतात', असे अनुष्का म्हणाली.
अनुष्काचे वडील लष्करात अधिकारी असल्याने त्यांच्या कुटुंबाचे देशातील बऱ्याच ठिकाणी वास्तव्य होते. ती आणि तिचा भाऊ कर्णेश लष्करी पार्श्वभूमीत मोठा झाले आहेत. एका लष्कर अधिकाऱ्याची मुले असल्याने आम्ही नवीन कल्पनांचा अवलंब करण्यास नेहमीच तयार असतो. आमचा देशभर प्रवास झाला. प्रवासाने आम्हाला स्थानिक गोष्टी समजण्यास खरोखर मदत केली. अशा अनुभवांमुळे आम्हाला कथा सांगण्यास आणि सामाजिक दृष्टीकोनापेक्षा निरनिराळ्या मार्गांनी त्याकडे पाहण्यास मदत झाली, असे अनुष्का म्हणाली.
चित्रपट पाहणे हे केवळ आपल्याला चित्रपटांना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करत नाही, तर आमच्या जीवनातील अनुभवांनी आम्हाला हा व्यवसाय समजण्यास मदत केली आहे. आम्ही नव्याने सर्व गोष्टींचा विचार केला, असे तिने सांगितले.
यशस्वी होण्याचे कोणतेही सूत्र नाही. या व्यवसायात प्रचंड अनुभवी असणारेही यशाचे सूत्र सांगू शकत नाहीत. आपण फक्त आपल्या चुकांमधून शिकतो. जेव्हा आपल्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत. तेव्हाही त्यामधून आपल्या काही नवीन शिकायला मिळते, असे ती म्हणाली.