ETV Bharat / sitara

धडाकेबाज अॅक्शन असलेला मराठी चित्रपट, 'ये रे ये रे पैसा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - शाल्मली खोलगडे

महागड्या गाड्या, हेलिकॉप्टरचा तामजाम यासोबतच अॅक्शन सिक्वेन्स, दमदार स्टारकास्ट हे सर्वकाही 'येरे येरे पैसा २' मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम अलिकडेच नाशिक येथे आली होती.

धडाकेबाज अक्शन असलेला मराठी चित्रपट, 'ये रे ये रे पैसा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
author img

By

Published : Aug 2, 2019, 7:00 PM IST

Updated : Aug 2, 2019, 7:44 PM IST

नाशिक - 'ये रे ये रे पैसा' चित्रपटाचा पहिला भाग हिट ठरल्यानतंर आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मराठीतील हा बिग बजेट चित्रपट मानला जातोय. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग इग्लंड येथे झाले आहे. महागड्या गाड्या, हेलिकॉप्टरचा तामजाम यासोबतच अॅक्शन सिक्वेन्स, दमदार स्टारकास्ट हे सर्वकाही 'ये रे ये रे पैसा २' मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम अलिकडेच नाशिक येथे आली होती. यादरम्यान चित्रपटातील कलाकारांशी आमच्या 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनीधीने संवाद साधला.

'ये रे ये रे पैसा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'ये रे ये रे पैसा २' ची निर्मिती अमेय खोपकर यांनी केली आहे. तर, हेमंत ढोके यांनी या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या आण्णा आणि त्यांचे अतरंगी साथीदार यांची ही गोष्ट आहे.

या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर, अशी दमदार स्टारकास्ट आहे.

संजय मेमाणे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, फैजल इमरान यांनी संकलन केलंय. ट्राय आरिफ यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. सुनील नवले यांनी रंगभूषा केली असून, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा, राहुल संजीव यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. यामध्ये अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांच्या आवाजातील गाणी देखील पाहायला मिळणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:धडाकेबाज अक्शन असलेला मराठी चित्रपट, ये रे ये रे पैसा पार्ट 2 ,9 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला.....

Body:मराठीतील बिग बजेट असलेला येरेयेरे पैसा पार्ट 2 ,9ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे , या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण इंग्लड मध्ये झाले असून,महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टरचा तामजाम सोबत धडाकेबाज ॲक्शन सिक्वेन्स,दमदार स्टारकास्ट यासोबत खटकेबाज संवाद हे सगळं येरेयेरेपैसा पार्ट 2,या मराठी चित्रपटात प्रेक्षकांना बघता येणार आहे,ह्या चित्रपटा विषय माहिती देण्यासाठी येरेयेरे पैसा पार्ट 2 टीम नाशिकला आली होती..

अमेय खोपकर ह्यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून असून हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलं आहे... कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या आण्णा आणि त्याचे अंतरंगी साथीदार यांची ही गोष्ट आहे..या चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज पोट धरून हसायला लावणारे संवाद हिंदी चित्रपटासारखी असलेली भव्यता आणि चकमकीत पणा ये रे ये रे पैसा पार्ट 2 मध्ये प्रेक्षकांना बघता येणार आहे ..

या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर ,प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे ,मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले ,विशाखा सुभेदार ,स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे, संजय मेमाणे यांनी कथानक केला असून फैजल इमरान यांनी संकलन ,ट्राय आरिफ यांनी संगीत आणि संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे...सुनील नवले यांनी रंगभूषा केली असून, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा, राहुल संजीव यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे ,यामध्ये अवधूत गुप्ते,मुग्धा कऱ्हाडे,शा ल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी गाणी गायली आहे..
बाईट
हेमंत ढोमे दिग्दर्शक

Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.