पणजी - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) निमित्ताने गोवा मनोरंजन संस्थेच्या (इएसजी) 'मिनी मुव्ही मँनिया' स्पर्धा घेण्यात आली होती. चित्रपट क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या कलाकार तंत्रज्ञ यांना संधी मिळावी, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गोवा विभागात डॉ. गुरुराज जोशी यांचा 'रॉंग नंबर' तर राष्ट्रीय विभागात प्रसाद महेकर यांचा 'अडगळ' हे लघुपट सर्वोत्कृष्ट ठरले.
कला अकादमीमध्ये आज या स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या सोहळ्याचे उद्घाटन चित्रपट महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इएसजी उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, इएसजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतीजा, परीक्षक शिवाजी लोटन पाटील, लिपिकासिंग दराई, आदित्य जांभळे आणि कमल स्वरूप आदी उपस्थित होते.
हेही वाचा -'ईफ्फी' सोहळ्याची सांगता, ब्लँश हँरिसन दिग्दर्शित 'पार्टिकल' ठरला 'सुवर्ण मयूर'चा विजेता
गोवा विभागात डॉ. गुरुराज देसाई सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. 'काझा दे सा 373' चे दिग्दर्शक विशाल गावस उपविजेता ठरले.
-
The winners of the 72-hour Short Filmmaking Competition held during #IFFI2019, were announced and felicitated with the cash prizes and trophy at the Award Ceremony today.
— IFFI 2019 (@IFFIGoa) November 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Find the complete list of winners here :https://t.co/8sq9AdI2ah@PIB_Panaji @satija_amit @esg_goa
">The winners of the 72-hour Short Filmmaking Competition held during #IFFI2019, were announced and felicitated with the cash prizes and trophy at the Award Ceremony today.
— IFFI 2019 (@IFFIGoa) November 29, 2019
Find the complete list of winners here :https://t.co/8sq9AdI2ah@PIB_Panaji @satija_amit @esg_goaThe winners of the 72-hour Short Filmmaking Competition held during #IFFI2019, were announced and felicitated with the cash prizes and trophy at the Award Ceremony today.
— IFFI 2019 (@IFFIGoa) November 29, 2019
Find the complete list of winners here :https://t.co/8sq9AdI2ah@PIB_Panaji @satija_amit @esg_goa
या विभागातील विजेता, उपविजेता आणि चित्रपट या प्रमाणे-
- ध्वनी - भावेश फुलारी (कॉन्शिअस)
- समीर हडकोणकर-दत्तराज दळवी (भितल्लो)
- पार्श्वसंगीत- भावेश फुलारी (कॉन्शिअस)
- महेंद्र वेरेकर (माळेवयली कूड)
- पटकथा- विशाल गांवस (कासा दे सा 373)
- नेहल च्यारी (आसदस्य)
- कथा- वैभव कळंगुटकर (दे टू )
- पंकज कारापूरकर (भितल्लो)
- संकलन- अक्षय लाड (अँन आऊटसायडर)
- प्रवीण घाडी-साइज नाईक (माळेवयली कूड)
- छायांकन- प्रवीण घाडी (माळेवयली कूड)
- निखिल हळदणकर (कॉन्शिअस)
- अभिनेत्री- सोनिया डिनिझ (काझा दे सा 373)
- अभिनेता - श्रीराम शिमोगा (रॉंग).
- राष्ट्रीय पातळीवर विजेते-
- चित्रपट- अडगळ (दिग्दर्शक- प्रसाद महेकर)
- अभिनेत्री- रावी किशोर (घरटं)
- अभिनेता- मधुसूदन पांडे (सार्थक)
- पटकथा- प्रसाद महेकर (अडगळ )
- कथा- राजेश शिरवईकर (इंडियन आऊटसायडर)
- संकलन- मुरली क्रूष्ण माण्यम (अनबिटेबल)
- छायाचित्रण- अब्दुल शफिक (तमस)
यावेळी संजय स्कूल पर्वरीच्या विशेष मुलांनी चित्रपट सादर केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्था संचालक आणि शिक्षक उपस्थित होते.
हेही वाचा -IFFI 2019 : 'भारतीय चित्रपटांची प्रगती' विषयावर सुभाष घईंसह तज्ञांनी मांडले मत