काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री तापसी पन्नू चित्रपट निर्मितीक्षेत्रात उतरली होती आणि ‘आउसाइडर फिल्म्स’ या निर्मितीसंस्थेची स्थापना केली होती. तिची पहिली निर्मिती म्हणजे चित्रपट ‘ब्लर’. काही दिवसांपूर्वी याचे चित्रीकरण सुरु झाले होते आणि आता त्याच्या शूटिंगचे ‘रॅप-अप’ झाले आहे. झी स्टुडिओज, एशेलॉन प्रॉडक्शन्स आणि तापसीच्या ‘आउटसाइडर फिल्म्स’ द्वारा बनवलेला ‘ब्लर’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा- सिध्दार्थच्या निधनाने शहनाझ गीलवर कोसळला दुःखाचा डोंगर
या गोष्टीला कोणीच नाकारू शकणार नाही की तापसी पन्नू एक प्रतिभाशाली अभिनेत्री आहे आणि आपली निर्मिती संस्था ‘आउटसाइडर फिल्म्स, अंतर्गत आगामी चित्रपट 'ब्लर' दर्शकांना आणखी एक रोमांचक अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. हा तापसी पन्नू अभिनीत सायकोलॉजिकल थ्रिलर असून याचे दिग्दर्शन केलंय अजय बहल यांनी. तापसी आणि गुलशन देवाय्या अभिनीत, पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिलेला हा मानसशास्त्रीय थरारक चित्रपट एका अपरिहार्य परिस्थितीत अडकलेल्या मुलीच्या कथेद्वारे आणि त्यानंतर येणारा थरार आणि नाट्यासोबत प्रेक्षकांना येऊन भिडतो.
हेही वाचा- वाचा.... सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपूर्वीचा घटनाक्रम
नयनरम्य नैनीतालमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या टीमने velvet चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळे आनंद व्यक्त केला आणि पार्टीसुद्धा. नैनीतालमध्ये आपल्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी बोलताना दिग्दर्शक अजय बहल म्हणाले, “नैनीताल लेक, मॉल रोड आणि इतर पर्यटन स्थळांसारख्या वास्तविक ठिकाणी शूटिंग करणे विशेषतः गर्दीमुळे कठीण होऊ शकते. आम्ही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत चित्रीकरण करायचो. पण आमच्या सर्वांसाठी हा एक पूर्णपणे समाधानकारक अनुभव होता. नैनीतालने चित्रपटात सौंदर्य आणि गूढ तितकेच जोडले आहे. "
हेही वाचा- सिध्दार्थ घरी परतला तेव्हा त्याच्या कारची काच फुटली होती..नेमक रात्री काय घडले?
पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिलेले, झी स्टुडिओज, तापसी पन्नूचे आउटसाइडर फिल्म्स आणि एशेलॉन प्रॉडक्शन्सचा 'ब्लर', हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलरपट आहे जो तुमच्या अंगावर शहारे आणेल. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - मृत्यूपूर्वी रात्री कुठे गेला होता सिध्दार्थ शुक्ला?