ETV Bharat / sitara

ऑस्कर 2022 : थप्पड प्रकरणी स्मिथची पत्नी जाडा पिंकेटने सोडले मौन - विल स्मिथला पश्चाताप

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेटने ऑस्कर सोहळ्यातील थप्पड प्रकरणावर मौन तोडले आहे. जाणून घ्या सोशल मीडियावर अभिनेत्री काय म्हणाली आहे.

जाडा पिंकेटने सोडले मौन
जाडा पिंकेटने सोडले मौन
author img

By

Published : Mar 30, 2022, 12:54 PM IST

मुंबई - 94 वा अकादमी पुरस्कार संपल्यानंतरही चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथने मनोरंजन विश्वातील सर्वात मोठ्या अवॉर्ड शोमध्ये एका कॉमेडियनला स्टेजवर मारलेली थप्पड. ही बातमी जगभर आगीसारखी पसरली आहे. सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. मात्र, विल स्मिथला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असून त्याने या प्रकरणी कॉमेडियन ख्रिस रॉकची माफीही मागितली आहे. विल स्मिथची पत्नी जाडा पिकेंट हिच्यामुळे ही घटना घडली होती. आता असून तिने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे.

जाडा पिंकेटने सोडले मौन - जाडा पिंकेटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट आता त्या थप्पड प्रकरणासारखी व्हायरल होत आहे. तिनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे- ''हा सिझन उपचार करण्याचा आहे आमि मी इथे त्यासाठीच आहे.'' ज्यावेळी ख्रिस रॉकला विल स्मिथने थोबाडीत मारली होती त्यानंतर विलची पत्नी जाडाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

जाडा पिंकेटची सोशल मीडियावर प्रतिक्रिया
जाडा पिंकेटची सोशल मीडियावर प्रतिक्रिया

ख्रिस रॉकने विनोद का केला? - अवॉर्ड शोदरम्यान ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेटच्या टक्कल पडण्यावर खिल्ली उडवली होती. डेमी मूरच्या 'GI जेन' (1997) चित्रपटाचा संदर्भ देत क्रिस रॉक म्हणाला होता की, आता जाडा पिंकेट 'GI Zen 2' ची प्रतीक्षा करू शकत नाही. या क्षणी, विल स्मिथने आपला संयम गमावला आणि स्टेजवर जाऊन रॉकला थप्पड मारली.

जाडा पिंकेटला कोणता आजार आहे? - जाडा पिंकेट एक यशस्वी हॉलिवूड अभिनेत्री आहे. सध्या ती अलोपेसिया नावाच्या आजाराने त्रस्त आहे. पिंकेटने 2018 मध्ये सोशल मीडियावर येऊन याबद्दल सांगितले होते. अ‍ॅलोपेशिया या आजारात लोकांचे केस झपाट्याने गळू लागतात किंवा असे म्हणता येईल की या आजारात केस गठ्ठ्याने गळू लागतात. अलोपेसिया हा स्वयंप्रतिकार रोग आहे. या आजारात शरीराच्या प्रत्येक भागात केस गळायला लागतात.

हेही वाचा - 'काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ब्रिटिश संसदेकडून निमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.