ETV Bharat / sitara

कंगनाच्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटावर पोस्टर चोरीचा आरोप - राजकुमार राव

'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी याचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. मात्र, या फोटोंवर एका युरोपियन युवतीने चोरीचा आरोप केला आहे.

कंगनाच्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटावर पोस्टर चोरीचा आरोप
author img

By

Published : Jul 30, 2019, 7:29 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतचा काही दिवसांपूर्वीच 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनापूर्वी अनेक वादविवादात अ़डकलेल्या या चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. प्रदर्शनानंतरही चित्रपट आता पुन्हा एका नव्या कचाट्यात अडकला आहे.

'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी याचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. मात्र, या फोटोंवर एका युरोपियन युवतीने चोरीचा आरोप केला आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे या पोस्टरमध्ये वापरलेली कला ही तिच्या कल्पनेतून आली आहे.

फ्लोरा असे या युवतीचे नाव आहे. ती एक हंगेरीयन कलाकार आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिने अशाप्रकारे तयार केलेल्या बऱ्याच कलाकृती पाहायला मिळतात. त्यामुळे कंगना आणि राजकुमारचा लूक असलेले पोस्टर तिची कल्पना असल्याचे तिने म्हटले आहे.

  • oh yeah, this image somehow reminds me of.. oh wait. looks like totally my work! 😕😕😕😕 https://t.co/6XhiK317Re

    — Flora Borsi (@FloraBorsi) July 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फ्लोराने हे पोस्टर शेअर करून म्हटले आहे, की 'काही साम्य वाटतेय का? बॉलिवूडच्या या बिग बजेट चित्रपटाने माझी कलाकृती वापरताना मला साधे विचारलेही नाही किंवा माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला नाही. एखाद्याची कलाकृती चोरणे हे कितपत योग्य आहे?'

राजकुमार रावने देखील अशाचप्रकारचे एक पोस्टर शेअर केले होते. हा फोटो देखील फ्लोराने शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे.
फ्लोराच्या या पोस्टवर अद्याप कंगना किंवा राजकुमार यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चित्रपट निर्मात्यांनीही याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.