मुंबई - बॉलिवूड कलाकारांसाठी फिल्मफेअर पुरस्कार हा अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. मात्र, अभिनेत्री विद्या बालनसाठी हा पुरस्कार सोहळा एका खास कारणासाठी महत्वाचा आहे. त्याची एक आठवण विद्याने शेअर केली आहे.
विद्याने एका कार्यक्रमात आपली ही खास आठवण सांगितली. फिल्मफेअर पुरस्काराच्या एका सोहळ्यादरम्यानच विद्या आणि तिचे पती दिग्दर्शक सिद्धार्थ रॉय कपूर यांची पहिली भेट झाली होती. विद्याला तेव्हा 'पा' चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला होता. या कार्यक्रमादरम्यान विद्या आणि सिद्धार्थच्या नात्याला सुरुवात झाली होती.
हेही वाचा -'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मानच्या आवाजातलं गाणं
'त्यावेळी सिद्धार्थसोबत लग्न होईल हे वाटले नव्हते. मात्र, पुढे काही काळानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 'फिल्मफेअर' माझ्यासाठी खूप खास आहे', असे विद्याने सांगितले.
४ डिसेंबर २०१९ ला विद्या आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी लग्नगाठ बांधली होती. अलिकडेच तिच्या 'पा' चित्रपटालाही १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांच्यासोबत भूमिका साकारली होती. तर, 'आर. बल्की' यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या सेटवर कॅटरिनाने केली साफसफाई, अक्षयने शेअर केला मजेदार व्हिडिओ
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, विद्या मागच्या वर्षी 'मिशन मंगल' या चित्रपटात झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत भूमिका साकारली होती. आता ती 'शकुंतला देवी' या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवीची प्रेरणादायक कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुकही प्रदर्शित झाला आहे. तिच्यासोबत 'दंगल' फेम सान्या मल्होत्राचीही भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -गौरी खानच्या शानदार पार्टीत कलाकारांनी लावले चार चांद, पाहा फोटो