जयपूर - बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन अलिकडेच जयपूर येथील महाराणा प्रताप सभागृहात आयोजित 'अनप्लग्ड' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. जयपूरच्या लेडीज ऑर्गनाइजेशनकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान विद्याने आपल्या चित्रपट कारकिर्दिविषयी आणि वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से उलगडले.
यावेळी विद्याने आपल्या संघर्ष काळातील घटना सांगितल्या. तसेच, महिला सक्षमीकरणावरही तिने चर्चा केली. चित्रपट हे माध्यम समाजाचेच एक प्रतिबिंब आहे. जे समाजात घडतं, तेच चित्रपटांच्या माध्यमातून पडद्यावर दाखवण्यात येतं, असे ती यावेळी म्हणाली. कार्यक्रमात उपस्थित महिलांना तिने समाजासाठी काहीतरी करण्याचे आवाहनही केले.
हेही वाचा -लाईफ बियॉन्ड रिल: मयुरी कांगोची दुसरी यशस्वी इनिंग
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, विद्या लवकरच ह्युमन कंम्प्युटर अशी ओळख असलेल्या 'शकुंतला देवी' यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला.
यावर्षी तिने 'मिशन मंगल' चित्रपटातही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची बरीच प्रशंसा झाली.
हेही वाचा -'नेट प्रॅक्टिस' लघुपटाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक, 'लाईट दिस लोकेशन' महोत्सवात मारली बाजी