ETV Bharat / sitara

विकी कौशल बनणार 'भूत', थरारक पोस्टर प्रदर्शित - karan johar

'उरी' चित्रपटाच्या यशानंतर त्याचे आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान निर्माण झाले आहे. आता पहिल्यांदाच तो हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.

विकी कौशल बनणार 'भूत', थरारक पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jun 10, 2019, 11:52 AM IST

मुंबई - अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा विकी कौशल लवकरच एका हॉरर चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे. 'भूत' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच विकीने एका हॉररपटात झळकणार असल्याची माहिती दिली होती. तर, दिग्दर्शक करण जोहरनेही त्याच्या हॉररपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांची वर्णी लागली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

विकीने आत्तापर्यंत 'मसान', 'संजू', 'राजी', 'मनमर्जिया' आणि उरी' या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्येही तो झळकला. 'उरी' चित्रपटाच्या यशानंतर त्याचे आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान निर्माण झाले आहे. आता पहिल्यांदाच तो हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.

Vicky Koushal play horrer film, poster out
'भूत' चित्रपटाचे पोस्टर

त्याने सोशल मीडियावर 'भूत' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 'भीतीच्या जगात हरवून जा' ( डर की दुनिया मे खो जाओ), असे कॅप्शन त्याने या पोस्टरवर दिले आहे.

हा चित्रपट शशांक खेतान आणि करण जोहर मिळून तयार करणार आहेत. तर, भानू प्रताप सिंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात येणार आहे. आता विकीला भूताच्या रूपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Intro:Body:

ent news 07

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.