ETV Bharat / sitara

विकी कौशलच्या फॅनगर्लचे स्वप्न झाले साकार, इंदूरमध्ये खाऊ घातले समोसे - मानुषी छिल्लर

अभिनेता विक्की कौशल सध्या माहेश्वरमध्ये मानुषी छिल्लरसोबत शुटिंग करीत आहे. इंदूरमध्ये पोहोचलेल्या विकीला एक अनोखा अनुभव आला. त्याची एक गर्ल फॅन विकीला भुक लागली असेल असे मसजून समोसा घेऊन आली होती. हा संस्मरणीय अनुभव त्याने शेअर केलाय.

Vicky Kaushal
विकी कौशल
author img

By

Published : Feb 2, 2021, 7:22 PM IST

Updated : Feb 2, 2021, 7:32 PM IST

मुंबई - अभिनेता विक्की कौशलने त्याच्या आगामी चित्रपटासाठी मध्य प्रदेशातील माहेश्वर गाठले आहे. इथे तो मानुषी छिल्लरसोबत शुटिंगमध्ये सहभागी होणार आहे. पण शुटिंगला सुरू होण्यापूर्वी त्याने इंदूरमध्ये काही संस्मरणीय क्षण अनुभवले. त्याच्या एका वेड्या गर्ल फॅनने तो भुकेला असेल समजून त्याच्यासाठी समोसा आणि जिलेबी आणली होती.

विकी कौशल आणि मानुषी छिल्लर पुढील काही दिवस माहेश्वरमध्ये यशराज फिल्म्सच्या शुटिंगमध्ये सहभागी होणार आहेत. विकीने मंगळवारी सकाळी विमान पकडले आणि इंदूरला पोहोचला. तो इंदूरहून माहेश्वरला जाणार आहे याची कल्पना हर्षिता नावाच्या त्याच्या गर्ल फॅनला आल्यानंतर तिने भेट घेण्याची निश्चित केले होते.

Vicky Kaushal
विकी कौशलच्या फॅनगर्लने इंदूरमध्ये खाऊ घातले समोसे

हर्षिता इन्स्टाग्रामवर फॅन्स पेज चालवते. विकी इज माय लाईफलाईन असे या पेजचे नाव आहे.

कौशलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून या अनोख्या गर्ल फॅनचा समोसा आवडल्याचे लिहिले आहे. "म्हटले होते खाणार नाही, पण राहावले नाही. (कहां था नही खाऊंगा, पर रहा नहीं गया.) मला भुक लागली असेल असा विचार फॅन्स करु शकतात, हे भारी वाटले. आई वडिलांना न सांगता एअरपोर्टवर जिलेबी आणि समोसे घेऊन भेटायला आली. ( जर तुम्ही वाचले तर काका, काकू रागवू नका.) तुला भरपूर प्रेम. इंदूरचे समोसे खरंच कमाल आहेत यार." समोसा हातात धरत विकीने आपला एक फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा - अनुभव सिन्हांच्या 'अनेक'मधील आयुष्मानचा लूक

दरम्यान, वाईआरएफच्या आगामी कॉमेडीशिवाय विकी कौशलच्या हातात सरदार उधम सिंग, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ बायोपिक आणि द इम्मोर्टल अश्वत्थामा या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा - आरंभ : प्रभास, सैफ अलीच्या 'आदिपुरुष'च्या शुटिंगला सुरुवात

Last Updated : Feb 2, 2021, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.