ETV Bharat / sitara

आयुष्यमान-वाणी जोडीची केमेस्ट्री कमाल करेल - अभिषेक कपूर - वाणी कपूर आणि आयुष्यमान खुराणाची जोडी

अभिषेक कपूर दिग्दर्शित आगामी चित्रपटात वाणी कपूर आणि आयुष्यमान खुराणाची जोडी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वाणी आणि आयुष्मान पहिल्यांदा स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.

abhishek-kapoors
अभिषेक कपूर
author img

By

Published : Aug 7, 2020, 2:44 PM IST

मुंबई - प्रगतशील प्रेमकथा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक कपूर दिग्दर्शित आगामी चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर हिला आयुष्मान खुराणाच्या विरोधात कास्ट करण्यात आले आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. हा एक ह्रदयस्पर्शी प्रेमकथा असलेला चित्रपट असल्याचे वाणीने म्हटलंय. आयुष्यमानसोबत काम करण्यासाठी तिला आनंद झालाय.

ती म्हणाली, "आयुष्मान हा आमच्या पिढीतील सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे आणि ही सुंदर प्रेमकथा साकारण्यासाठी आमच्या पहिल्या चित्रपटासाठी मी आनंदित झाले आहे.

एकाहून एक चित्रपट हिट देणाऱ्या आयुष्यमान खुराणासोबत वाणी स्क्रीन स्पेस शेअर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अभिषेक कपूरसोबत काम करण्याबाबत विचारले असता तिने पुढे सांगितले की, ''अभिषेक कपूर यांच्या चित्रपटांमुळे मला नेहमी प्रेरणा मिळाली आहे, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक होते. या चित्रपटाचा भाग झाल्याने मला आश्चर्यकारक संधी मिळाली आहे.''

हेही वाचा - अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय, सोनाक्षीने वाहिली श्रद्धांजली

दिगदर्शक अभिषेक कपूर म्हणाले, "वाणीने बेफिक्रेमध्ये अप्रतिम काम केले होते, असे मला वाटते. ती एक सुंदर आणि प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिला सेटवर मला आयुष्यमानसोबत ठेवायचे आहे. दोघांची केमेस्ट्री कमाल करेल."

या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराणाची क्रॉस-फंक्शनल एथलीटची भूमिका आहे. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा असून या चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

आयुष्मानच्या कधीही न पाहिलेला अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ''आयुष्मानला त्याने यापूर्वी न केलेले शारीरिक परिवर्तन घडवून आणावे लागेल. हे एक आव्हान आहे आणि तो त्यासाठी वचनबद्ध आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.