ETV Bharat / sitara

उर्मिला मातोंडकरांचे इन्स्टाग्राम हॅक, सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल - शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री आणि अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम उकाऊंट हॅक झाले आहे. याबाबत मुंबईच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Urmila Matondkar
उर्मिला मातोंडकर
author img

By

Published : Dec 21, 2020, 7:00 PM IST

मुंबई - शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर याचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व व्हिडिओ आणि फोटो गायब झाले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत.

उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे- 'माझे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. पहिल्यांदा त्याने थेट संदेश पाठविला आणि त्यात नमूद केलेल्या काही गोष्टींचे अनुसरण करून खाते प्रमाणीकरणाबद्दल बोलले व त्यानंतर खाते हॅक केले. दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की त्यांनी महाराष्ट्र सायबर क्राइम सेलकडे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याची तक्रार दाखल केली आहे.

उर्मिला मातोंडकरांचे इन्स्टाग्राम हॅक

इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यावर उर्मिलाची सर्व पोस्ट डिलीट झाली आहेत. जर आपण यापूर्वी उर्मिलाचे इंस्टा खाते पाहिले असेल तर त्यावर सर्व फोटो आणि व्हिडिओ होते. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून व्यावसायिक जीवनापर्यंतचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण आता उर्मिलाचा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही किंवा ती आता कोणालाही फॉलो करत आहे.

हेही वाचा - 'अतरंगी रे'साठी शाहजहांच्या अवतारात अक्षय कुमार

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची एफआयआर दाखल केली. अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल झाला असून कलम, 43, 66, (66 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - अंतिम' फर्स्ट लूक : सलमान खान भिडला मेव्हणा आयुष शर्मासोबत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.