ETV Bharat / sitara

सर्वांर्थानं आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारा चित्रपट, ‘हॅशटॅग प्रेम’! - Hashtag Prem Marathi Movies

​“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...” म्हणूनच कदाचित ते सिनेमाकर्त्यांसोबतच रसिकांनाही नेहमी भुरळ घालत असतं असं प्रेमाबद्दल म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. व्हॉट्सअ‌ॅप लग्न, ऑनलाईन मॅरेजनंतर आता एक नवीन पिक्चर येऊ घातलाय, ज्यांचं नाव आहे ‘हॅशटॅग प्रेम’. मिताली मयेकर आणि सुयश टिळकची अनोखी लव्हस्टोरी घेऊन, ‘हॅशटॅग प्रेम’, हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

हॅशटॅग प्रेम मराठी चित्रपट
हॅशटॅग प्रेम मराठी चित्रपट
author img

By

Published : Jan 15, 2021, 7:01 PM IST

मुंबई - जेव्हापासून सिनेमा बनतोय तेव्हापासून प्रेम हा विषय हाताळला जातोय आणि आजही त्या विषयातील स्वारस्य तसूभरही कमी झालेलं दिसत नाही. आधुनिक काळात तंत्रज्ञानात झालेली प्रगती ‘प्रेमाच्या’ पथ्यावरच पडलीय. त्यामुळे इंटरनेटच्या जमान्यात चित्रपटही प्रेम तरुणाईच्या भाषेत व्यक्त होताना दिसतंय. सिनेमांच्या नावातही तंत्रज्ञान-वाचक शब्द घुसलेले दिसतात. व्हॉट्सअ‌ॅप लग्न, ऑनलाईन मॅरेज इ. आता एक नवीन पिक्चर येऊ घातलाय, ज्यांचं नाव आहे ‘हॅशटॅग प्रेम’.

​“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...” म्हणूनच कदाचित ते सिनेमाकर्त्यांसोबतच रसिकांनाही नेहमी भुरळ घालत असतं असं प्रेमाबद्दल म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सिनेसृष्टीच्या उदयापासून नेहमीच प्रेमकथेवर आधारित सिनेमे बनत असले तरी यातील आकर्षण अद्याप तसूभरही कमी झालं नसल्याची जाणीव नव्यानं येणारे सिनेमे नेहमीच करून देत असतात. ‘हॅशटॅग प्रेम’ या आगामी मराठी सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी रसिकांसमोर उलगडणार आहे. शीर्षकावरूनच हा सिनेमा आजच्या काळातील असल्याची जाणीव करून देणारा ठरतो.

हेही वाचा - मनोरंजक मसालापट : मास्टर!

​आजच्या सोशल मीडियाच्या “हॅशटॅग’’च्या जमान्यातील “प्रेम’’ प्रेक्षकांना या सिनेमात पहायला मिळणार आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी “माऊली फिल्म प्रोडक्शन’’च्या बॅनरखाली बनवलेला हा सिनेमा वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या “पिकल एंटरटेनमेंट’’च्या सहकार्याने सिनेरसिकांसमोर प्रस्तुत केला जाणार आहे. निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी ‘हॅशटॅग प्रेम’च्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आहे. दिग्दर्शक राजेश जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा सर्वार्थानं आजच्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणारा असून, तरुणाईला मार्गदर्शक ठरणारा आहेच, परंतु एक सुज्ञ विचार देणाराही आहे.

‘हॅशटॅग प्रेम’
‘हॅशटॅग प्रेम’
‘हॅशटॅग प्रेम’ हा सिनेमा प्रेक्षकांचं सर्वतोपरी मनोरंजन करेलच, पण त्यासोबतच सामाजिक संदेशही देणारा असल्यानं प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा ठाम विश्वास निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी व्यक्त केला आहे. बऱ्याच वर्षांपासून मराठी सिनेवितरणातील अग्रगण्य नाव बनलेल्या “पिकल एंटरटेनमेंट’’ने आजवरच्या काळात बऱ्याच आशयघन सिनेमांचे यशस्वी वितरण केले असून आता निर्मात्यांच्या साथीने सिनेमा प्रदर्शित करण्याच्या वाटेवर नवं पाऊल ठेवलं आहे. आम्ही नेहमीच रसिकांची आवड-निवड जोपासत आणि कलेचा उचित सन्मान राखत रसिकांचं मनोरंजन केलं असून, ‘हॅशटॅग प्रेम’ हा आगामी सिनेमा हाच आमचा वसा जोपासणारा असल्याचं मत समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी व्यक्त केलं आहे.
‘हॅशटॅग प्रेम’
‘हॅशटॅग प्रेम’
​प्रेमकथा म्हटल्यावर प्रेमी युगुल आलंच. या सिनेमात प्रेक्षकांना एक नवं कोरं प्रेमी युगुल पहायला मिळणार आहे. ‘हॅशटॅग प्रेम’मध्ये मिताली मयेकर आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत असून, त्यांची अनोखी केमिस्ट्री या सिनेमाचं आकर्षण ठरणार आहे. आजवर कधीही समोर न आलेलं कथानक, मातब्बर कलाकारांचा कसदार अभिनिय, सुमधूर गीत-संगीताची संगीतमय मेजवानी, नयनरम्य लोकेशन्समधील नेत्रसुखद निसर्गसौंदर्य, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि मनमोहक सादरीकरण हे या सिनेमाचे प्लस पॉईंट आहेत. ‘हॅशटॅग प्रेम’ची कथा-पटकथा निखिल कटारे यांनी लिहिली असून आघाडीचे संगीतकार प्रवीण कुंवर यांनी या सिनेमातील गीतांना सहजसुंदर संगीत दिले आहे. नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांनी केलं असून कलादिग्दर्शन केशव ठाकूर यांचं आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांच्या नजरेतून हा सिनेमा प्रेक्षकांना पहायला मिळणार असून महेश भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली आहे. मिताली मयेकर आणि सुयश टिळकची अनोखी लव्हस्टोरी घेऊन, ‘हॅशटॅग प्रेम’, हा सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा - मोनालिसा बागलचा मराठमोळा साज, फोटोज शेअर करत दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.