मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सतत शेतकरी चळवळीबाबत आपले मत व्यक्त करत असते. पण दरम्यान, या विषयावर तिने अनेक सिने तारे-तारकांशी वाद घातलाय. ट्विटरवर कंगना रणौत आणि पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजित दोसंझ यांच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शीतयुद्ध सुरू झाले आहे. दोन्हीही कलाकार एकमेकांना चांगले आणि वाईट म्हणत आहेत. खरं तर, कंगनाने अलीकडेच शेतकऱ्यांच्या निदर्शनात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेबद्दल ट्विट केले होते, यावर दिलजीत दोसंझ याने तिला इतके आंधळे होणे बरे नसल्याचे म्हटले आहे.
दिलजीत दोसंझच्या या ट्विटवर कंगना रणौत खूप चिडल्याचे पाहायला मिळाले. कंगनाने ट्विटरवर लिहिले, "ये करण जोहरच्या पाळीव प्राण्या, जी दादी शाहिनबागच्या नागरिकतेसाठीच्या आंदोलनात होती तिच बिलकीस बानो दादीजी शेतकऱ्यांच्या एमएसपीच्या आंदोलनातही आहे. महिंदर कौरजीला तर मी ओळखतच नाही. काय नाटक लावलंय तुम्ही? हे लगेच बंद करा. या ट्विटमध्ये कंगनाने दिलजीतला करण जोहरचा पाळीव म्हटले आहे.
हेही वाचा - हिना खानने मालदिवच्या सुट्टीत केली 'नाईट मोड' फोटोग्राफी
यावर दिलजीत दोसंझ यांनी प्रतिक्रिया म्हणून लिहिले: " तू जितक्या लोकांसोबत चित्रपट केलेस त्या सर्वांची तू पाळीव आहेस...? मग तर यादी मोठी होत जाईल मालिकांची...? हे बॉलिवूडवाले नाहीत पंजाबवाले आहेत. खोटं बोलून लोकांना भडकवणे आणि भावनांशी खेळणे तुला चांगलेच माहिती आहे."
यावर कंगना रणौतने पुढे लिहिले: "ये चमचा चल, तू ज्यांची चाटतोस मी त्यांना रोज वाजवते. जास्त उड्या मारु नकोस, मी कंगना रणौत आहे तुझ्यासारखी चमचा नाही. मी फक्त शाहिनबागवाल्या आंदोलनावर कॉमेंट केली आहे. जर कोणी चुकीचे ठरवले तर माफी मागेन.''
हेही वाचा - अलिबागच्या समुद्रात दीपिका पदुकोणने सिध्दार्थ चतुर्वेदीसोबत घेतला सनसेटचा आनंद
त्यानंतर दिलजीत दोसंझ याने प्रतिक्रिया देताना लिहिलेः "तुला बोलण्याचे भान नाही."