ETV Bharat / sitara

सत्य आणि प्रामाणिकपणा यांचाच होतो विजय- प्रकाश झा - परीक्षा चित्रपट

गोव्याची राजधानी पणजीत सुवर्ण महोत्सवी भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू असून यामध्ये प्रकाश झा यांचा 'परीक्षा' हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये आदिल हुसेन आणि प्रियांका बोस यांच्या भूमिका आहेत.

प्रकाश झा
author img

By

Published : Nov 24, 2019, 9:46 PM IST

पणजी- शिक्षणामुळे समानसंधी मिळते हे समजण्यामागे भावना महत्त्वाची आहे. भावना हे जीवनाचे सत्य आहे. कोणत्या संस्थेत अथवा माध्यामातून शिक्षण घेतले म्हणजे सर्वकाही सहज मिळविता येते हा गैरसमज दूर करणारा संदेश 'परीक्षा' चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कारण जीवनात सत्य आणि प्रामाणिकता यांचाच विजय होत असतो, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी 'ईटीव्ही भारत' बरोबर बोलताना व्यक्त केले.

'परीक्षा' या आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रकाश झा

सध्या गोव्याची राजधानी पणजीत सुवर्ण महोत्सवी भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. यामध्ये झा यांचा 'परीक्षा' हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये आदिल हुसेन आणि प्रियांका बोस यांच्याही भूमिका आहेत. आजच्या घडीला पालकांच्या शिक्षण विषयक मानसिकता कशी आहे. ती कशामुळे बदलली जाऊ शकते. यावर यामधून भाष्य करण्यात आले आहे.

दिग्दर्शक म्हणून आपण या चित्रपटाकडे कसे पाहता असे विचारले असता झा म्हणाले, 'परीक्षा' मधून आम्ही कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक गरीब रिक्षावाला आपल्या मुलासाठी खूप मोठी स्वप्ने पाहत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी कशी मेहनत करतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे. जीवनात सुधारणा घडवून आणाण्याकरिता शिक्षण आवश्यक आहे. याची जाणीव असल्याने मुलाची आई शिक्षणासाठी कशी मागे लागते ही याची मध्यवर्ती कल्पना आहे.

भावना जीवनाचे सत्य आहे. शिक्षणामुळे समान संधी प्राप्त करता येतात. असे सांगून झा म्हणाले, जशी कथा आहे त्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उगाचच गुंतागुंत वाढविलेली नाही. लोक यामधील संदेश समजून घेतील अशी आशा आहे. प्रत्येक मुलगा कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे, हे आवश्यक नाही. परंतु, अलिकडे पालक आपली मुलं कशा पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अथवा मोठ्या संस्थेत शिकतील याच्या मागे लागतात. शिक्षण कोठूनही घ्या परंतु, सत्य आणि प्रामाणिकता हेच जीवनात जिंकत असतात.

चित्रपटात वडिलांच्या भूमिका साकारणारे आदिल हुसेन म्हणाले, वडील मुलासाठी सर्व काही करत असले तरीही सत्य समजल्यावर मुलगा काय म्हणेल अशी भीती वडिलांच्या मनात आहे. परंतु, जेव्हा त्या सत्य समजून घेतो तेव्हा वडिलांना मोक्ष प्राप्ती झाल्यासारखी वाटते. मला चित्रपट खूप आवडला असून लोकांनाही आवडेल, अशी अपेक्षा आहे. तर आईची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री प्रियांका बोस म्हणाली, मला या विषयाबद्दल खूपच आदर आहे. दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा जे बनवतात ते पूर्ण विचार करून बनवतात यावर माझा विश्वास असल्याने चित्रपट स्वीकारला. 2019मध्ये शिक्षणाचे महत्त्व काय? याची सर्वांनाच माहिती असल्याने अशा विषयावर काम करताना आवडले. लहानपणी माझी आई जे काही सांगत होती, ते आता समजते. चित्रपटातील संवाद खूपच प्रभावी वाटतात.

Intro:पणजी : शिक्षणामुळे समानसंधी मिळते हे समजण्यामागे भावना महत्त्वाची आहे. भावना हे जीवनाचे सत्य आहेत. कोणत्या संस्थेत अथवा माध्यामातून शिक्षण घेतले म्हणजे सर्वकाही सहज मिळविता येते हा गैरसमज दूर करणारा संदेश 'परीक्षा' चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. कारण जीवनात सत्य आणि प्रामाणिकता यांचाच विजय होत असतो, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी 'ईटीव्ही भारत' बरोबर बोलताना व्यक्त केले.

Body:सध्या गोव्याची राजधानी पणजीत सुवर्ण महोत्सवी भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू आहे. यामध्ये झा यांचा 'परीक्षा' हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. ज्यामध्ये आदिल हुसेन आणि प्रियांका बोस यांच्याही भूमिका आहेत. आजच्या घडीला पालकांच्या शिक्षण विषयक मानसिकता कशी आहे. ती कशामुळे बदलली जाऊ शकते. यावर यामधून भाष्य करण्यात आले आहे.
दिग्दर्शक म्हणून आपण या चित्रपटाकडे कसे पाहता असे विचारले असता झा म्हणाले, 'परीक्षा' मधून आम्ही कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक गरीब रिक्षावाला आपल्या मुलासाठी खूप मोठी स्वप्ने पाहत असतो आणि ती पूर्ण करण्यासाठी कशी मेहनत करतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे. जीवनात जर सुधारणा घडवून आणाण्याकरिता शिक्षण आवश्यक आहे. याची जाणीव असल्याने मुलाची आई शिक्षणासाठी कशी मागे लागते ही याची मध्यवर्ती कल्पना आहे.
भावना जीवनाचे सत्य आहे. शिक्षणामुळे समान संधी प्राप्त करता येतात, असे सांगून झा म्हणाले, जशी कथा आहे, त्याप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. उगाचच गुंतागुंत वाढविलेली नाही. लोक यामधील संदेश समजून घेतील अशी आशा आहे. प्रत्येक मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकले पाहिजे, हे आवश्यक नाही. परंतु, अलिकडे पालक आपले मुलं कशा पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अथवा मोठ्या संस्थेत शिकेल याच्या मागे लागतात. शिक्षण कोठूनही घ्या, परंतु, सत्य आणि प्रामाणिकता हेण जीवनात जिंकत असतात.
मुलगा आणि वडील यामधील संवादातून संदेश देण्याचा प्रयत्न आहे, असेही झा म्हणाले.
चित्रपटात वडिलांच्या भूमिका साकारणारे आदिल हुसेन म्हणाले, वडील मुलासाठी सर्व काही करित असले तरीही सत्य समजल्यावर मुलगा काय म्हणेल अशी भीती वडिलांच्या मनात आहे. परंतु, जेव्हा त्या सत्य समजून घेतो तेव्हा वडिलांना मोक्ष प्राप्ती झाल्यासारखी वाटते. मला चित्रपट खूप आवडला असून लोकांनाही आवडेल, अशी अपेक्षा आहे. तर आईची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री प्रियांका बोस म्हणाल्य, मला या विषयाबद्दल खूपच आदर आहे. दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा जे बनवतात ते पूर्ण विचार करून बनवतात यावर माझा विश्वास असल्याने चित्रपट स्वीकारला. 2019 मध्ये शिक्षणाचे महत्त्व काय ? होती सर्वांनाच माहिती असल्याने अशा विषयावर काम करताना आवडले. लहानपणी माझीआई जे काही सांगत होती, ते आता समजते. चित्रपटातील संवाद खूपच प्रभावी वाटतात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.