ETV Bharat / sitara

नागा चैतन्य आणि सई पल्लवीच्या 'लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज - 'लव्ह स्टोरी' चित्रपटाचा थिएटर ट्रेलर

नागा चैतन्य आणि सई पल्लवीच्या आगामी 'लव्ह स्टोरी' चित्रपटाचा थिएटर ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. चाहत्यांना त्यांच्या संगीतमय प्रेमकथेची एक झलक यातून दिसली आहे. सोशल मीडियावर हा ट्रेलर चर्चेचा विषय बनला आहे.

'लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज
'लव्ह स्टोरी'चा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Sep 13, 2021, 10:50 PM IST

हैदराबाद - नागा चैतन्य आणि सई पल्लवीच्या 'लव्ह स्टोरी'चा थिएटर ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. दोघांच्याही चाहत्यांनी याचे प्रचंड स्वागत केले आहे. शेखर कम्मुला दिग्दर्शित या चित्रपटाची कथा कलेच्या ध्यासाने एकत्र आलेल्या दोघांची आहे. ट्रेलरमधील साई पल्लवीच्या डान्स मुव्हज प्रेक्षणीय दिसल्या आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चैतन्यने सोमवारी ट्रेलर रिलीज झाल्याची घोषणा आपल्या ट्विटरवर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''अखेरीस ट्रेलर बाहेर पडल्यावर खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये भेटण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही. 'लव्ह स्टोरी' 24 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.''

कामाच्या पातळीवर नागा चैतन्य वडिल अभिनेता नागार्जुनसोबत 'बंगाराजू' आणि अभिनेत्री राशी खन्नासोबत 'थँक यू'मध्ये दिसणार आहे. तो आमिर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' मध्ये हिंदीतही पदार्पण करणार आहे. दरम्यान, सई पल्लवी राणा दग्गुबतीसह 'विराट पर्वम' आणि नानीसह 'श्याम सिंह रॉय' या तिच्या तेलगू चित्रपटांच्या रिलीजची वाट पाहत आहे.

हेही वाचा - अभिनेता अनिल कपूर करणार ग्लोबल सिटीझन लाईव्हचे सूत्रसंचालन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.