वॉशिंग्टन, यूएस - ऑस्कर पुरस्कारांनी नामांकित 'डून' हा चित्रपट 25 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर इंग्रजी, हिंदी, तमिळ तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सने हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रिम करण्याचा निर्णय घेतला आहे.
साय-फाय ब्लॉकबस्टर फ्रँक हर्बर्टच्या 1965 च्या कादंबरीवर आधारित आहे ज्याला 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली पुस्तकांपैकी एक मानले जाते आणि आतापर्यंतच्या अनेक महान चित्रपटांना प्रेरणा देण्याचे श्रेय दिले जाते. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल प्रीमियरमध्ये 'डून'ला आठ-मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते. 1965 च्या साय-फाय क्लासिकच्या त्याच्या चित्तथरारक रूपांतरासाठी डेनिस विलेन्युव्हची खूप प्रशंसा झाली आहे.
या चित्रपटात ऑस्कर-नामांकित अभिनेता टिमोथी चालमेट, रेबेका फर्ग्युसन, ऑस्कर आयझॅक, जोश ब्रोलिन, स्टेलन स्कार्सगार्ड, डेव्ह बौटिस्टा, झेंडाया, जेसन मोमोआ आणि जेवियर बर्डेम यांच्या भूमिका आहेत.
'Dune'चा प्रीमियर HBO Max वर त्याच दिवशी झाला ज्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, परंतु हा चित्रपट प्लॅटफॉर्मवर फक्त 30 दिवसांसाठी उपलब्ध होता. हा चित्रपट 10 मार्च रोजी HBO Max वर ऑस्करसाठी अंतिम मतदानाच्या काही दिवस आधी परत येईल.
हेही वाचा - ‘सीआयडी’ मधील ‘तोड दे दरवाजा दया’ चा दयानंद शेट्टी करतोय मराठीत पदार्पण!