मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफला चॅरिटीसाठी फिल्म इंडस्ट्रीच्या सहकाऱ्यांसोबत फुटबॉल खेळत असताना दुखापत झाली. टायगरला दुखापत झाल्याचे समजताच त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पाटणी तात्काळ त्याची काळजी घेण्यासाठी पोहोचली.
चॅरिटीसाठी रविवारी आयोजित केलेल्या सेलिब्रिटी फुटबॉल सामन्यासाठी टायगर श्रॉफ खेळत होता. यावेळी सामन्याचा आनंद दिशा पाटणीही लुटत होती. यावेळी मैदानात अर्जुन कपूर, अपशक्ती खुराना, मीझान, अहान शेट्टी हेदेखील खेळत होते.
मैदानावर काही व्यूव्हरचना करीत खेळताना टायगरच्या पायाला दुखापत झाली. नंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर डॉक्टरकडे आणण्यात आले. यावेळी दिशा त्या दिशेने चालत गेली. टायगरला झालेली दुखापत किरकोळ होती. काही वेळानंतर तो मैदानाच्या बाहेर दिशासोबत चालत निघून गेला.
कामाच्या पातळीवर टायगर श्रॉफ हा कृती सेनॉनची मुख्य भूमिका असलेल्या गणपत या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. तसेच हिरोपंथी या चित्रपटाच्या सीक्वेलमध्येही काम करीत आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी रद्द केले सर्व सामाजिक कार्यक्रम, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय