ETV Bharat / sitara

स्वप्निल जोशीच्या ‘बळी’ने वाढवली उत्सुकता - स्वप्निल जोशी बळी चित्रपट टीझर न्यूज

स्वप्निल जोशी लवकरच एका भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बळी' असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

Swapnil Joshi
स्वप्निल जोशी
author img

By

Published : Mar 21, 2021, 9:14 AM IST

मुंबई - ‘समांतर आणि लपछपीच्या निर्मात्यांची प्रस्तुती’ अशा शब्दांनी सुरुवात होणाऱ्या ‘बळी’च्या टिझरमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘जीसिम्स’ची निर्मिती असलेल्या प्रस्तुतकर्ते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नवीन व बहुप्रतीक्षित ‘बळी’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टिझर पाहूनच त्यावर ‘लाईक्स’चा पाऊस पडला.

'बळी’ची या अगोदर दोन पोस्टर प्रदर्शित केली गेली होती. त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपट कधी येतोय, अशी विचारणा सुरू झाली आहे. हॉरर चित्रपट म्हटला की विशाल फुरियापेक्षा आणखी चांगला पर्याय काय असू शकतो? हा चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना एक वेगळा आणि अभूतपूर्व असा अनुभव मिळवून देईल, हे आम्ही नक्की सांगू शकतो. स्वप्निल जोशी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे हे तर ‘सोनेपे सुहागा’ आहे, असे ‘जीसिम्स’चे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी सांगितले.

“लपाछपी’पेक्षाही हा वेगळा चित्रपट आहे आणि त्याची प्रचीती प्रेक्षकांना या टीझरवरून आली असेल. यातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. निर्मितीमूल्यांमध्ये निर्मात्यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. त्यामुळे एक देखणा चित्रपट या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे, असे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आलेले दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी ‘बळी’बद्दल बोलताना सांगितले.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऊसासे टाकणाऱ्या आवाजातील एका आईचे आर्त उद्गार कानी पडतात. काही सेकंदांचा हा टीझर अत्यंत भाती निर्माण करतो. अंगावर शहारा आणतो. एक स्त्री ‘बाSSळा’ अशी आर्त हाक घालते आहे. त्यानंतर या चित्रपटाचा नायक एका पडक्या वाडारुपी रुग्णालयात कुणाचातरी शोध घेताना दिसतो. ‘मी इथेच आहे बाळा,’ असा त्या आईचा काहीसा घाबराघुबरा आवाज ऐकू येतो. ती आई ‘घाबरू नकोस...’ म्हणत आपल्या बाळाला धीर देवू पाहते. त्या पाठोपाठ ‘एलिझाबेथSS’ अशी हाक ऐकू येते. ही एलिझाबेथ कोण, त्यातील आईचे आणि तिचे काही नाते आहे का? चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी कुणाचा शोध घेत आहे, हे ‘बळी’ चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल. विशाल फुरिया दिग्दर्शित आणि स्वप्नील जोशी अभिनित ‘बळी’ हा हॉरर चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - इंडियन आयडॉलच्या मंचावर शिल्पा शेट्टीने दिला ‘बाजीगर’च्या गोष्टींना उजाळा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.