प्रताप फड लिखित दिग्दर्शित ‘अनन्या’ या नाटकाने अनेक विक्रम केले. जवळपास चाळीसेक पुरस्कारांवरत्याचे नाव कोरले गेले आहे. त्याच कथानकावर आधारित प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ हा चित्रपट येतोयज्यात ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. येत्या १० जूनला 'अनन्या'चे वेगळेपण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘अनन्या' म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास 'अनन्या' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलायेणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे', अशी सकारात्मक टॅगलाईन असलेल्या 'अनन्या' याचित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप काही सांगणाऱ्या या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्यादिसत आहे, जी आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायलामिळणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आपल्या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे म्हणते, ''आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणिसकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे निर्माता रवी जाधव म्हणतात, ''महिला दिनाच्यानिमित्ताने ‘अनन्या’ चे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या निमित्ताने आम्ही सर्व महिलांचासन्मान करत आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.'' निर्माता संजय छाब्रिया म्हणाले की, ''जीवनाकडे बघण्याचासकारात्मक दृष्टिकोन खूप मह्त्वाचा आहे. 'अनन्या'मधून आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. अनन्याचीही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.''
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणिदिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरासांभाळली आहे. नावाला सार्थ असणारी 'अनन्या' १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - चार्ली चॅप्लिनवर आधारित नाटक 'द क्लॅप', मिलाप थिएटरनं उचललं शिवधनुष्य