ETV Bharat / sitara

आयुष्मान-भूमीच्या चाहत्यांची चंगळ, 'शुभमंगल ज्यादा सावधान'चा झाला मुहूर्त

author img

By

Published : Sep 10, 2019, 3:25 PM IST

आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या 'शुभमंगल ज्यादा सावधान' चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे. अधिक धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.

'शुभमंगल ज्यादा सावधान'चा झाला मुहूर्त

मुंबई - 'शुभमंगल ज्यादा सावधान' या नव्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. निर्माता भूषण कुमार, आनंद एल राय आणि आयुष्यमान खुराणा यांनी क्लॅप देऊन शूटींगला सुरूवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मीडियाकर्मी उपस्थित होते.

#ShubhMangalZyadaSaavdhan begins... Release date finalized: 13 March 2020... Stars Ayushmann Khurrana... Directed by Hitesh Kewalya... Produced by Bhushan Kumar and Aanand L Rai. pic.twitter.com/J9VxDFQXN4

— taran adarsh (@taran_adarsh) September 10, 2019

'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा दुसरा भाग येत आहे. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची जोडी पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळेल.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असेल. पहिल्या भागापेक्षा अधिक मनोरंजन यात होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

'शुभमंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्या करणार आहेत. १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.

मुंबई - 'शुभमंगल ज्यादा सावधान' या नव्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. निर्माता भूषण कुमार, आनंद एल राय आणि आयुष्यमान खुराणा यांनी क्लॅप देऊन शूटींगला सुरूवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मीडियाकर्मी उपस्थित होते.

'शुभ मंगल सावधान' या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा दुसरा भाग येत आहे. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची जोडी पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळेल.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असेल. पहिल्या भागापेक्षा अधिक मनोरंजन यात होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

'शुभमंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्या करणार आहेत. १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.