मुंबई - बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande) यांची शौर्य गाथा सांगणारा ‘पावनखिंड’ ( Pawankhind) चित्रपटाचा टीझर ( Pawankhind Teaser ) प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘पावनखिंड’ हा आणकी एक ऐतिहासिक विषयावरील चित्रपट आहे. यांनी ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाचा (Historical film) टीझर रिलीज केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी या रणसंग्रामाचा लढा आणि बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. लढण्याची जिद्द असेल तर प्रचंड फौजफाटा आणि अमाप शस्त्रास्त्रांचा वापर न करतासुद्धा लढाई जिंकता येते याचा प्रत्यय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांची जिद्द पाहताना येतो. याच प्रबळ जिद्दीच्या बळावर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पावनखिंडीचा लढा अभूतपूर्व पराक्रमाने लढला.
शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं 'पावनखिंड' नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.‘पावनखिंड’ पुढील वर्षी 21 जानेवारी 2022 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'पावनखिंड' हा चित्रपट दिग्पालनं संकल्प केलेल्या 'शिवराज अष्टका'तील तिसरं पुष्प आहे. या पुष्पमालेतील 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लवकरच पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम सिनेरसिकांना चित्रपटगृहांमध्ये अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा - ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिले होते 500 कोटी बजेटच्या चित्रपटाचे वचन