मुंबई - अभिनेता सुर्या शिवकुमार यांच्या 'जय भीम' या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. तमिळ भाषेत असलेला हा टिझर मागास असलेल्या आदिवासी समाजाच्या छळाची व्यथा मांडताना दिसतो. यात सुर्या शिवकुमार आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी झगडणाऱ्या वकीलाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
SURIYA SIVAKUMAR: 'JAI BHIM' TEASER LAUNCHED... #AmazonPrimeVideo unveils the teaser of courtroom drama #JaiBhim... The #Tamil film - starring #SuriyaSivakumar - premieres 2 Nov 2021 on #AmazonPrimeVideo... #JaiBhimTeaser: https://t.co/HoIgYukMbX@Suriya_offl pic.twitter.com/ty58bfKTSr
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">SURIYA SIVAKUMAR: 'JAI BHIM' TEASER LAUNCHED... #AmazonPrimeVideo unveils the teaser of courtroom drama #JaiBhim... The #Tamil film - starring #SuriyaSivakumar - premieres 2 Nov 2021 on #AmazonPrimeVideo... #JaiBhimTeaser: https://t.co/HoIgYukMbX@Suriya_offl pic.twitter.com/ty58bfKTSr
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2021SURIYA SIVAKUMAR: 'JAI BHIM' TEASER LAUNCHED... #AmazonPrimeVideo unveils the teaser of courtroom drama #JaiBhim... The #Tamil film - starring #SuriyaSivakumar - premieres 2 Nov 2021 on #AmazonPrimeVideo... #JaiBhimTeaser: https://t.co/HoIgYukMbX@Suriya_offl pic.twitter.com/ty58bfKTSr
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2021
'जय भीम' हा चित्रपट अन्यायाविरुध्द लढा पुकरणाऱ्या समाजाची कथा आहे. समाजात काही जातींना वाळीत टाकले जाते, त्यांच्यावर चोर समजून अत्याचार केले जातात. अशा लोकांसोबत पोलीस अत्यंत क्रूरपणे वागतात. वकीलाच्या भूमिकेत असलेला सुर्या शिवकुमार केवळ पोलिसांच्या विरोधात आपला लढा उभारत नाही तर संपूर्ण व्यवस्था आणि सत्ताधारी यांना आपले लक्ष्य बनवतो. अंगावर शहारे आणणारे काही प्रसंग टिझरमध्ये पाहायला मिळातात.
'जय भीम' हा चित्रपट 2 नोव्हेंबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. तामिळ स्टार सुर्या शिवकुमारसोबत प्रकाश राजचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.
हेही वाचा - गुलाबो सिताबो फेम फर्रुख जाफर यांच निधन; 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास