मुंबई - इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातृत्वाच्या महानतेसाठी नेहमीच सांगितली जाते. 'आई' या शब्दाचं सामर्थ्य सांगणारी ही कथा आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीची भूमिका साकारणार असून या भूमिकेतील सोनालीचा लूक नुकताच समोर आला आहे.
सिनेमाचं एक टीझर पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. ज्यात सोनालीच्या लूकसोबतचं हिरकणीच्या कथेबद्दलही सांगण्यात आलं आहे. सायंकाळी रायगडाचे सर्व दरवाजे बंद झाल्यानंतर आपलं बाळ घरी एकटं असल्यानं कड्यावरून उतरण्याचे साहस करणाऱ्या इतिहासातील त्या मातेची कथा या सिनेमातून मांडली जाणार आहे.
-
आईच्या प्रेमाला शौर्याची जोड देणारी "हिरकणी"
— हिरकणी (@meSonalee) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#हिरकणी #lookreveal#Hirkani #24oct #1monthtogo@zee24taasnews @abpmajhatv @MiLOKMAT @LoksattaLive @mataonline @SakalMediaNews @timesofindia @JaiMaharashtraN @9XJhakaas @PuneTimesOnline @RajshriMarathi @boxofficeindia @ibnlokmattv1 pic.twitter.com/lB0aBgQXjG
">आईच्या प्रेमाला शौर्याची जोड देणारी "हिरकणी"
— हिरकणी (@meSonalee) September 25, 2019
#हिरकणी #lookreveal#Hirkani #24oct #1monthtogo@zee24taasnews @abpmajhatv @MiLOKMAT @LoksattaLive @mataonline @SakalMediaNews @timesofindia @JaiMaharashtraN @9XJhakaas @PuneTimesOnline @RajshriMarathi @boxofficeindia @ibnlokmattv1 pic.twitter.com/lB0aBgQXjGआईच्या प्रेमाला शौर्याची जोड देणारी "हिरकणी"
— हिरकणी (@meSonalee) September 25, 2019
#हिरकणी #lookreveal#Hirkani #24oct #1monthtogo@zee24taasnews @abpmajhatv @MiLOKMAT @LoksattaLive @mataonline @SakalMediaNews @timesofindia @JaiMaharashtraN @9XJhakaas @PuneTimesOnline @RajshriMarathi @boxofficeindia @ibnlokmattv1 pic.twitter.com/lB0aBgQXjG
अभिनेता प्रसाद ओक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून त्याच्या दिग्दर्शनात बनणारा हा दुसरा सिनेमा आहे. ‘कच्चा लिंबू’ या मराठी चित्रपटातून प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २४ ऑक्टोबरला 'हिरकणी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.