ETV Bharat / sitara

शिवाजी महाराजांची तत्त्वे सामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘हरीओम‘ चित्रपटाचे टीझर-पोस्टर प्रदर्शित! - छत्रपती शिवाजी महाराज हरिओम चित्रपट न्यूज

चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर हा सिनेमा नक्कीच अ‌ॅक्शनपट असणार. पोस्टरवर पिळदार शरीरयष्टी असलेले दोन तरुण उभे असून त्यांच्या खांद्यावर 'जय जगदंब' आणि 'जय दुर्गे' असे लिहिले आहे. सोबतच समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि एक किल्ला देखील दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून लोकांमध्ये चित्रपटाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोस्टरवरील गोष्टींवरून हा सिनेमा जरी अ‌ॅक्शन ड्रामा वाटत असला तरी हा कौटुंबिक सिनेमादेखील असणार आहे.

हरीओम चित्रपटाचे टीझर-पोस्टर प्रदर्शित
हरीओम चित्रपटाचे टीझर-पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Jan 24, 2021, 6:40 PM IST

मुंबई - शिवाजी महाराजांवर, त्यांच्या पराक्रमांवर चित्रपटांतून देखील अनेकदा प्रकाश टाकला गेला आहे. रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. शिवाजी महाराजांची तत्त्वे सामान्यजनांपर्यंत पोहोचविण्याचा विडा उचलत ‘हरीओम‘ या सिनेमाचे पहिले टीझर-पोस्टर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केले आहे.

हरीओम चित्रपटाचे टीझर-पोस्टर प्रदर्शित
हरीओम चित्रपटाचे टीझर-पोस्टर प्रदर्शित

हेही वाचा - अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे अभिनित 'शेजारी शेजारी' चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण!

चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर हा सिनेमा नक्कीच अ‌ॅक्शनपट असणार. पोस्टरवर पिळदार शरीरयष्टी असलेले दोन तरुण उभे असून त्यांच्या खांद्यावर 'जय जगदंब' आणि 'जय दुर्गे' असे लिहिले आहे. सोबतच समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आणि एक किल्ला देखील दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर पाहून लोकांमध्ये चित्रपटाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोस्टरवरील गोष्टींवरून हा सिनेमा जरी अ‌ॅक्शन ड्रामा वाटत असला तरी हा कौटुंबिक सिनेमादेखील असणार आहे.

चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर यांनी सांगितले की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये होती. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. आमच्यासाठी देखील शिवाजी महाराज आमचे दैवतच आहे. त्यामुळे आम्ही आमची पहिली कलाकृती त्यांचा आशीर्वाद घेऊन सुरु करत आहोत. आज आमच्या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होत असून, आम्ही ते पोस्टर महाराजांना समर्पित करीत आहोत. आम्ही आमच्या सिनेमातून महाराजांची तत्त्वे नक्कीच लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू." तत्पूर्वी या चित्रपटाचे निर्माते असलेल्या हरिओम घाडगे यांनी तान्हाजी मालुसरेंच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले असून या शुभकामाचे भूमीपूजन झाले आहे.

श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाबाबतची अधिकची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा - नवोदित समर्थक शिंदेचं 'करवली' गाणं सप्तसूर म्युझिकवर झालं लाँच!

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.